भाषा विषयात 100 पैकी 100 गुण मिळविणे अशक्य आहे. पण सर्वोत्तम /उच्चांकी गुण प्राप्त करणे मुळीच अवघड नाही. भाषा विषयाचा पेपर लिहिताना विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचा कस लागतो. स्वच्छ, सुंदर, नीटनेटके आणि स्पष्ट लेखन आवश्यक आहे. गणित, विज्ञान, या सारख्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणे फार सोपे आहे कारण अशा विषयात शुद्धलेखन काटेकोरपणे तपासले जात नाही. पण इंग्लिश विषयात शब्दांचे स्पेलिंग, व्याकरण, वाक्यरचना, मांडणी इत्यादी साऱ्याच बाबी विचारात घेतल्या जातात. 10 वी / 12 वी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना इंग्लिश विषयात 90 हून अधिक गुण प्राप्त करता यावेत यासाठी मी उपयुक्त टिप्स देत आहे.
- पाठ्यपुस्तकाचा सखोल अभ्यास करा – पाठ्यपुस्तकातील सर्व धडे आणि कवितांचा अर्थ, महत्त्वाची वाक्ये, आणि धड्याचा आशय विषय नीट समजून घ्या. प्रत्येक धडा आणि कवितेच्या खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नाची मुद्देसूद उत्तरे वाचा, पाठांतर करा. (अधिक माहितीसाठी आवश्यकता भासल्यास गाईडचा वापर करायला हरकत नाही.)
- व्याकरण अभ्यास -व्याकरणाचा अभ्यास सखोल आणि व्यवस्थित करा. यामध्ये प्रामुख्याने Parts of Speech, Tenses, Active & Passive Voice, Direct & Indirect speech, Degree, Frame Wh questions, Clause Analysis, Sentence Transformation etc. यावर विशेष भर दिला पाहिजे.
- लेखन कौशल्ये – निबंध लेखन आणि पत्रलेखनाच्या बाबतीत महत्त्वाच्या विषयांवर निबंध आणि औपचारिक व अनौपचारिक पत्रलेखनाचा सराव करा. निबंध लेखन आणि पत्र लेखन करताना प्रभावी आणि परिणामकारक सुरुवात, 2 – 3 परिच्छेद मुद्द्यांना अनुसरून लिहावेत. निबंध आणि पत्र लेखनाचा शेवट उत्तम असायला हवा. प्रत्येक मुद्दा स्पष्ट व्हायला हवा.
- रचनात्मक लेखन: Story writing, Report writing, Dialogue writing, Interview Questions यांचाही सराव करा. त्यासाठी प्रस्तावना (Introduction) आणि निष्कर्ष (Conclusion) चांगली व आकर्षक प्रस्तावना आणि प्रभावी निष्कर्ष लिहिण्यावर भर द्या.
- वाचन कौशल्य सुधारणा : परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या उताऱ्यावरील प्रश्नांसाठी गद्य आणि पद्याचे तुकडे वाचून त्यांचा अर्थ समजून घेण्याचा सराव करा. यामध्ये factual, inference, personal response, complex, global understanding, Grammar, Vocabulary यावर आधारित प्रश्नांची उत्तरे यांचा पुरेपूर सराव करणे आवश्यक आहे.
विशेष सूचना अशी आहे की विद्यार्थ्यांनी प्रश्न समजून घेऊन उत्तर लिहावे. प्रश्न अचूक समजून घ्या आणि अपेक्षितच उत्तर लिहा.
पेपर सॉल्विंग टेक्निक्स - टाइम मॅनेजमेंट – वेळेचे योग्य नियोजन करा. आधी सोपे आणि नंतर कठीण प्रश्न सोडवा. कोणताही प्रश्न दुर्लक्षित राहू नये. उत्तरे लिहिताना प्रश्न आणि उप प्रश्न क्रमांक अचूक लिहा.
- स्पष्ट आणि स्वच्छ लिखाण – लेखन स्वच्छ आणि सुवाच्य ठेवा. योग्य ठिकाणी मथळे आणि उपमथळे द्या. आवश्यक ठिकाणी विशिष्ट शब्द अधोरेखित करू शकता.
- प्रत्येक उत्तर तपासा -उत्तर लिहून झाल्यावर ते पुन्हा एकदा वाचून पहा. खात्री करून घ्या की उत्तर समर्पक आहे.
- वाचन आणि शब्दसंग्रह नवीन शब्द शिका – दररोज 5 ते 10 नवीन शब्द आणि त्यांचे अर्थ, समानार्थी शब्द, आणि विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवा.5. Idioms आणि Phrases महत्त्वाच्या म्हणी आणि वाक्प्रचारांचे अर्थ आणि उपयोग समजून घ्या. त्यांचा परिपूर्ण आणि अर्थपूर्ण वाक्यात उपयोग करता आला पाहिजे.
- नियमित सराव आणि सातत्य ठेवा – दररोज 1 ते 2 तास इंग्रजीचा अभ्यास करा. मागील वर्षांचे प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून सराव करा.
- प्रभावी नोट्स तयार कराव्या -करणाच्या नियमांचे आणि महत्त्वाच्या उत्तरांचे छोटे नोट्स तयार करा. परीक्षेआधी जलद पुनरावलोकनासाठी त्या नोट्सचा उपयोग करा.9. विषय तज्ञांचा/ शिक्षकांचा सल्ला घ्यातुम्हाला जे प्रश्न समजत नाहीत, त्याबद्दल शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्या. किंवा मार्गदर्शक पुस्तके वापरून तुमचा सराव वाढवा.
- आत्मविश्वास ठेवा -परीक्षेच्या वेळेस घाई न करता आत्मविश्वासाने पेपर सोडवा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.
- प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट समजून घ्या – पेपरचे स्वरूप समजून घ्या (Section A: Reading, Section B: Writing, Section C: Grammar, Section D: Literature).प्रत्येक विभागासाठी वेगळी रणनीती तयार करा.नियमित सराव, सातत्य, जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वासामुळे तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता! सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!
संभाजीराव सूर्यवंशी
प्राचार्य, आयडीयल इंग्लिश स्कूल, शेख हुसेन काझी इंग्लिश हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज, महाड – रायगड