महाड, (प्रतिनिधी) – आवाज ग्रुपच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या दै. रायगडचा आवाज व सा. कोकण की आवाज या वृत्तपत्राच्या प्रतिनिधी, लेखक यांचा स्नेहमेळावा बुधवार दि. 25 डिसेंबर रोजी हॉटेल वेलकम येथील हॉलमध्ये संपादक दिलदार पुरकर, आवाज ग्रुपचे मार्गदर्शक मुफ्ती रफीक पुरकर, हनिफ पुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सकाळच्या सत्रात सा. कोकण की आवाज आणि दुपारच्या सत्रात दै. रायगडचा आवाज च्या प्रतिनिधींशी वृत्तपत्राच्या भविष्यातील वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली. याच बरोबर कोकण की आवाज व रायगडचा आवाज वृत्तपत्राला 20 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून 31 जानेवारी रोजी रायगडचा आवाजचा वर्धापन विशेषांक व कोकण की आवाजच्या वर्धापन दिन कार्यक्रमाबाबत चर्चा विनिमय करण्यात आली.
यावेळी संपादक दिलदार पुरकर यांनी गेली अनेक वर्षांपासून रायगडचा आवाज व कोकण की आवाजचे प्रतिनिधित्व करीत आहात. याही पुढे पेपर वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन केले. हनिफ पुरकर यांनी पत्रकारिता हे समाज सेवेचे कार्य असून जनतेचा आवाज असलेले वृत्तपत्र हे तुमचे हत्यार असून त्याचा गैरवापर न करता लोककल्याणासाठी करावा असे सांगितले.
यावेळी सैफुल्ला पुरकर यांनी एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत मार्गदर्शन केले तर दानिश लांबे यांनी आवाज न्यूज पोर्टलची माहिती दिली. या स्नेहमेळाव्यानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला.
याप्रसंगी वृत्तसंपादक संजय भुवड, पत्रकार राजेश भुवड, व्यवस्थापिका सुप्रिया नागांवकर, सलीम शेख, ॲड. सैफ चोगले, मौलाना मुजफ्फर सणगे, जमालुद्दीन बंदरकर, मुबीन बामणे, अशफाक कुपे, अहमद नाडकर, अखलाक उकये, जमील असद, मौलाना उसामा बरमारे, मौलाना दानिश लांबे, समीर रिसबुड, डॉ. शीतल मालुसरे, गंगाधर साळवी, रामचंद्र घोडमोडे, याकूब सय्यद, सुहास खरीवले, पुरुषोत्तम मुळे, नरेश कुशवाह, मारुती फाटक, रिजवान मुकादम, अक्रम झटाम, गौतम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.