कोकणासाठी पर्यटन हे वरदान !

जागतिक पर्यटन दिन हा 27 सप्टेंबर रोजी संपूर्ण जगात साजरा केला जातो. परंतू भारतात राष्ट्रीय पर्यटन दिवस 25 जानेवारीला साजरा केला जातो. उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून पर्यटनाचे विशेष महत्त्व आहे. पर्यटनाचे महत्त्व आणि अर्थव्यवस्थेतील पर्यटनाची मुख्य भूमिका याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पर्यटन दिन साजरा केला जातो. पर्यटन हा बहुसंख्य लोकांचा आवडता विषय आहे. पर्यटन दिनाचा मुख्य उद्देश पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना जागतिक स्तरावर आणणे हा आहे. या दिवसाच्या माध्यमातून लोकांना जागतिक स्तरावर पर्यटनाचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्य किती आहे, याची जाणीव होते.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेला कोकण हा एक सुंदर भूभाग आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशाचे परिपूर्ण मिश्रण कोकणात पाहायला मिळते. आपल्या हिरव्यागार टेकड्या, सोनेरी किनारे, ऐतिहासिक किल्ले आणि भव्य मंदिरे असलेले कोकण हे पर्यटकांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. कोकणाला 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे, तो उत्तरेला डहाणू आणि बोर्डी तसेच दक्षिणेला वेंगुर्ला येथे पसरत गेलेला आहे. कोकण हे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांनी बनलेले आहे. कोकण आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, ज्यात प्राचीन किनारे, हिरव्यागार टेकड्या आणि सुंदर लँडस्केप समाविष्ट आहेत. निसर्गप्रेमींसाठी हा प्रदेश एक परिपूर्ण पलायन आहे आणि हायकिंग, पोहणे आणि वॉटर स्पोर्ट्स सारख्या बाह्य क्रियाकलापांसाठी भरपूर संधी उपलब्ध करून देतो. कोकणात एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे जो त्याच्या ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये, प्राचीन मंदिरांमध्ये आणि स्थानिक पाककृतींमध्ये प्रतिबिंबित होतो. या प्रदेशात अनेक महत्त्वाच्या तीर्थस्थळांचे घर आहे आणि अभ्यागतांना स्थानिक परंपरा आणि जीवनशैली शोधण्याची संधी देते. कोकण आपल्या होमस्टेसाठी प्रसिद्ध आहे, जे अभ्यागतांना अस्सल सांस्कृतिक अनुभव आणि स्थानिकांशी संवाद साधण्याची संधी प्रदान करते. होमस्टेमध्ये राहणे हा स्थानिक चालीरीती आणि परंपरांबद्दल जाणून घेण्याचा आणि स्थानिक पाककृतीचा स्वाद घेण्याचा एक चांगला मार्ग आहे. कोकण आपल्या स्वादिष्ट सीफूड आणि पारंपारिक पाककृतीसाठी ओळखले जाते, जे महाराष्ट्र, गोवा आणि कोंकणी फ्लेवर्सचे मिश्रण आहे. हा प्रदेश अल्फोन्सो आंबा, मालवानी पाककृती झींगा आणि खेकडे यासारख्या सीफूड पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.
कोकणातील या भौगोलिक गुणधर्मांमुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी, पर्यटनाचा सर्वांगिण विकास व्हावा या उद्देशाने राज्य शासनाव्दारे नेहमीच नवनवीन अशा विविध योजना राबविल्या जातात. शासनाच्या या योजनांअतंर्गत कोकण विभागातील शाळा, कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी पर्यटन विकासासाठी युवा राजदूतांनी पुढाकार घेतला आहे. येथील पर्यटनस्थळांची माहिती देशविदेशांत पोहचविण्यासाठी तब्बल 56 युवा पर्यटन मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे कोकण प्रांतातील युवा वर्गाचे भविष्यात येथील पर्यटन विकासाचा मोठे योगदान राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त युवा पर्यटन मंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेतला. देशातील पर्यटन,समृध्द वारसा व संस्कृती यांचे माहितगार म्हणून जागतिकस्तरावर देशाची पर्यटन प्रसिध्दी करण्यासाठी भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविण्यासाठी युवा पर्यटन मंडळांची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यातून विद्यार्थी व तरुणांमध्ये संघ भावना,व्यवस्थापन नेतृत्व आणि सेवाभाव यासारखी महत्वाची कौशल्ये आत्मसात करण्याची गती वृत्ती आणि शाश्वत जबाबदार पर्यटनांची जाणीव, जागृती निर्माण करण्यात सहाय्य होईल असे शासनास अपेक्षित आहे.यात राज्यातील शासनमान्यप्राप्त आणि विद्यालयातील सातवीपासून पुढील वर्गातील विद्यार्थी एकत्र येऊन युवा पर्यटन मंडळाची स्थापना करु शकतात. यासाठी कार्यवाही शालेय शिक्षण क्रीडा विभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग राबवत आहे. युवा पर्यटन मंडळांनी कोणते उपक्रम राबवावेत याची माहिती केंद्राच्या पर्यटन मंडळाच्या संकेतस्थळावर दिली आहे.
25 कोटीची आर्थिक तरतूद
युवा पर्यटन मंडळ स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन स्वरुप अनुदान देण्यात येत आहे. यासाठी केंद्राने 2023-24 या वर्षाकरिता 25 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. शाळेमध्ये स्थापन होणाऱ्या एका युवा पर्यटन मंडळाला दहा हजार रूपये तर महाविद्यालयामध्ये स्थापन होणाऱ्या मंडळांना 25 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्यात येत आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार ही रक्कम पर्यटन संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करण्यास देण्यात येत आहे.कोकण विभागातील सर्व जिल्हयांतून या योजनेला शाळा महाविद्यालयांमध्ये मोठा प्रतिसाद लाभत आहे. विद्यार्थी एकत्र येऊन युवा पर्यटन मंडळे स्थापन करीत आहेत. आतापर्यंत 56 मंडळे स्थापन केली आहेत. देशाच्या पर्यटन विकासाचे प्रचारक बनण्यासाठी युवा राजदूत म्हणून विद्यार्थी पुढे येत आहेत. ज्याप्रमाणे देशाचे भविष्य तरुणांच्या हातात आहे. त्याप्रमाणे पर्यटन विकासाचे भविष्य सुध्दा घडविण्यासाठी आपला खांदा शालेय, कॉलेज स्तरावरील विद्यार्थी पुढे करीत आहेत.
नोंदणीसाठी आवाहन
युवाकांनी पर्यटनांची माहिती व्हावी त्यांचे नेतृत्वगुण विकासित व्हावे ,संघभावना निर्माण व्हावी यासाठी शाळा,कॉलेजमधील कमीत कमी 25 विद्यार्थ्यांनी पयर्टन क्लबची स्थापना करावी असा शासनाने निर्णय घेतला आहे. युवा पर्यटन मंडळ नोंदणीसाठी Yuva Tourisum club Registeration form https:// docsgoogle.com// forms/d/1wwlsS2eEQgyw 959SEnj8tmiLL SYEZ_Ntllttv_978/edit येथे अर्ज करण्याचे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे. असे हनुमंत हेडे, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, कोकण विभाग नवी मुंबई
महिलांच्या उन्न्तीसाठी आई पर्यटन योजना
पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग त्यांच्या आर्थिक विकासाकरिता एक चांगले साधन ठरु शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकासित करणाच्या अनेक संध्या उपलब्ध आहेत. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आई हे महिला केंद्रित , लिंग, समावेशक पर्यटन धोरण राज्य शासनाने जाहीर केले आहे. याचा फायदा घेऊन महिलांना पर्यटन व्यवसायाच्या माध्यामांतून आपली आर्थिक उन्नती साधण्याची संधी राज्याने उपलब्ध करुन दिली आहे.
पंचसूत्रीचा समावेश
राज्याने महिलांसाठी निर्माण केलेल्या आई पर्यटन धोरणांशी पंचसूत्री तयार केली आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला केंद्रित, लिंग समावेशक पर्यटन धोरण असताना महिला उद्योजकता विकास महिलांसाठी पायाभूत धोरण आखताना महिला उद्योजकात विकास, महिलांसाठी पायाभूत सुविधा, महिला पर्यटकाया सुरक्षितेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकासाठी कस्टमाईज उत्पादने आणि सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास या पाच सूत्रांचा यात समावेश आहे. यासाठी कार्यदल समिती राहणार आहे. नियोजन, वित्त,पर्यटन, महिला व बाल विकास, कौशल्य व रोजगार विकास या विभागाच्या सचिवांचा यात समावेश केला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने व्यवस्थापकीय संचालक,पर्यटन संचालनालयमध्ये संचालकांचाही यात समावेश केला आहे.
नोंदणी बंधनकारण
महिला पर्यटन व्यावसायिकांना लाभ मिळण्यासाठी आपला पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे. पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालविलेला असला पाहिजे. महिलांच्या मालकीच्या हॉटेल, रेस्टॉरेंटमध्ये 50 टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल एजन्सीमध्ये 50 टक्के कर्मचारी महिला असणे बंधनकारक आहे.पर्यटन व्यावसायकरीता आवश्यक सर्व परवाना प्राप्त असणे गरजेचे आहे. कर्जाची हप्ते वेळेत भरले तरच शासनाच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे.
प्रोत्साहने व सवलती
या योजनेतंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने प्रोत्साहने व सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने औरंगाबाद येथील पर्यटक निवास राज्यातील प्रथम पूर्णत महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सीचे अर्का रेस्टॉरेंट पूर्णता महिला संचालित रेस्टॉरेंट म्हणून चालविण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या टूर ऑपरेटरमार्फत आयोजित पर्यटन सार्किट पॅकेजमध्ये महिला पर्यटकांना 20 टक्के सूट देण्यात येणार आहे. या 20 टक्के सवलतीची रक्कम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे टूर ऑपरेटरला दिली जाणार आहे. याकरिता होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांस शासनाकडून करण्यात येणार आहे.
महिलांसाठी टूर पॅकेजेस
सर्व महिला पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट, युनिटमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 1 ते 8 मार्च या कालावधीत व वर्षभरात इतर 22 दिवस अशा प्रकारे एकूण 30 दिवस केवळ ऑनलाईन बुकिंगमध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास मंहामंडळाच्या मालमत्तेच्या ठिकाणी महिला बचतगटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आदीच्या विक्रीसाठी स्टॉल, जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याचबरोबर महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभावात्मक टूर पॅकेजसही उपलब्ध करुन दिली आहेत. महिला केंद्रित पर्यटन धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यटन संचानलयामध्ये महिला पर्यटन धोरणांतून राज्य शासनाने महिला पर्यटन व्यावसायिक व महिला पर्यटक वाढावेत यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेला दिसतो.
राज्य पर्यटन विभागाने पर्यटन विकासासाठी विविध धोरणे आखण्यास सुरुवात केली आहे. यातीलच आई हे महिला पर्यटन धोरण आहे. हे पर्यटन राज्याच्या पर्यटन विकासासाठी महत्वाचे ठरणार आहे.पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या अथवा नव्याने येऊ इच्छित असलेल्याय महिलांना प्रोत्साहन बळ देणारे हे धोरण आहे. महिला पर्यटन व्यावसायिक घडवितांनाच महिला पर्यटक वाढावे यासाठी सवलती देण्यात येत आहेत. ज्येष्ठ महिला, दिव्यांग महिला यात समावेश आहे.

Share