ठाणा श्रीवर्धन बागमांडला गाडीचे टायमिंग रामभरोसे

प्रवाशांना नाहक त्रास.नागरिकांची एस. टी. महामंडळावर नाराजी

श्रीवर्धन, (रामचंद्र घोडमोडे) – गेली अनेक वर्ष सुरू असलेली बागमांडला श्रीवर्धन ठाणा या गाडीची ठाणा येथून 11 वाजता सुटण्याची वेळ निश्चित आहे. या गाडीने श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला पंचक्रोशीतील सर्व गावे, हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र, तसेच श्रीमंत पेशव्यांची जन्मभूमी ओळख असलेल्या श्रीवर्धन या नगरीतील परिसरातील सर्वच नागरिक या गाडीने प्रवास करत असतात. ठाणा, मुलुंड, ऐरोली आजूबाजूच्या उपनगरातील असंख्य पर्यटक. हरिहरेश्वर. काळ भैरवनाथ. आई सोमजाई देवी वर श्रद्धा असणारे असंख्य नागरिक या गाडीच्या माध्यमातून प्रवास करत असतात. गेली अनेक वर्ष प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवासी बांधवांच्या ठाणा येथून गाडीच्या सुटण्याच्या वेळेच्या वेळेमध्ये एक,ते दोन,तास उशिर होत असल्याची तक्रार आहे. मात्र हीच गाडी सकाळी 7 वाजता वेळेत बागमांडला येथून पुन्हा परतीचा प्रवास ठाण्याला जाण्या करिता वेळेत सुटते. खोपट डेपो मधुन रोज गाडी वेळेत सोडण्या संदर्भात होणाऱ्या हलगर्जी पणाच्या कारभाराला कुठेतरी लगाम घालण्या साठी ठोस भूमिका घेण्याची मागणी गाडीने प्रवास करणारे प्रवासी करत आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील तसेच एस टी महामंडळावर असणारे राजकीय नेतृत्व करणाऱ्या मान्यवराने सुद्धा ही बाब गांभीर्याने घेत पुढील होणाऱ्या विलंबाच्या प्रवासाला कुठेतरी पूर्णविराम द्यावा ही मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दि. 6/12/2024 रोजी तर चक्क दुपारी 1. 30 ह्या वेळेत ठाणा येथून बागमांडला येथे येण्याकरिता निघाली. यामुळे श्रीवर्धन परिसरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास करावा लागला. तसेच श्रीवर्धन बस डेपो मध्ये बागमांडला गाडीची वाट पाहणाऱ्या कामानिमित्ताने श्रीवर्धन मध्ये येत असणाऱ्या बागमांडला परिसरात नागरिकांना सुद्धा त्रास सहन करावा लागला आहे.

गाडीने प्रवास करणारे प्रवासी, वयोवृद्ध नागरिक वेळेत गाडी पकडण्याकरिता अर्धा पाऊण तास डेपोजवळ पोहोचत असतात. आगाऊ बुकिंग करणाऱ्या सर्व प्रवासी बांधवांना डेपो व्यवस्थापनच्या गलथान कारभारामुळे नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. यावर ठोस उपाय योजना करण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.

Share