दुबई, कोकणातील दुबई स्थित प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक वलिदअब्दुल्ला रखांगे यांच्या कुटुंबातील आदिबा रखांगेने एमबीएएस परीक्षेत 83% गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण कोकणात आनंदाची लाट उसळली आहे.
आदिबाने फक्त एमबीएएसमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली नाही, तर तिने स्पेशल चाइल्ड (विशेष मुलांसाठी) शैक्षणिक प्रकल्पामध्येही महत्त्वाचे योगदान दिले आहे. या प्रकल्पामुळे अनेक पालकांना त्यांच्या मुलांसाठी योग्य शैक्षणिक मार्गदर्शन मिळाले आहे.याशिवाय, आदिबाने युनिव्हर्सिटीतील नेतृत्वक्षमतेचे प्रदर्शन करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. यामुळे तिला ‘बेस्ट स्टुडंट लीडर` हा पुरस्कारही मिळाला आहे. डॉ. आदिबा रखांगेने आपल्या भविष्यासाठी ठरवलेल्या उद्दिष्टांसाठी काम करताना विविध कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवले आहे. तिच्या या यशामुळे कोकणातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान बनली आहे. डॉ. अदिबाचे काका व राजकिय व समाजिक क्षेत्रात नवाजलेली व्यक्ति खालिद रखांगे, साजिद रखांगे, शाहिद रखांगे, मुनाफ वाडकर व इतर नातेवाईक यांनी आनंद व्यक्त केला व शुभेच्छा दिल्या.