खेड-शहरातील बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.ए केजी एण्ड प्रायमरी व एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता मा.संस्थाध्यक्ष श्री.ए.आर.डी खतीब सरांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. त्यासाठी मा.प्रमुख पाहुणे म्हणून कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे मा.उप कुलगुरू श्री.संजय घनश्याम भावे सर उपस्थित होते. सकाळी खेड शहरातून प्रभातफेरी तसेच शाळेत विविध विषयांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.लेझीम पथकासह पाहुण्यांचे स्वागत करताना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचा ध्वजारोहण करताना केक कापून आनंद साजरा केला. मुबस्शीरा बंदरकरच्या कुरआन पठणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जैनब जोगीलकर एण्ड ग्रुपने दुआचे तर शिफा ठाकूरने नात-ए-पाकचे गायन केले. परकार सरांनी पाहुण्यांचा परिचय करून देताना पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. मेहबुबी दुदुके एण्ड ग्रुपने स्वागत गीताचे सुरेख गायन केले. उपस्थित पाहुण्यांपैकी श्री.अरवींद तोडकरी सरांनी आर.डी सरांच्या कार्याचे कौतुक करताना संस्थेच्या यशाबद्दल अभिनंदन केले. प्रशालेच्या प्रथम मुख्याध्यापिका श्रीमती.नसीम मुकादम मॅडम यांनी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देताना सर्व जुन्या आठवणींना उजाळा देऊन शालेय प्रगतीचा सर्वांसमोर आलेख मांडला. प्रमुख पाहुणे भावे सरांनी शिक्षणाचे महत्त्व, मूल्य शिक्षणाचे फायदे, समाधानाचे महत्त्व व मोबाईलचे दुष्परिणाम सांगताना जीवनात उच्च ध्येय बाळगण्याचे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात खतीब सरांनी सामाजिक व राजकीय जीवनाचे महत्त्व सांगताना स्वर्गवासी वडीलधारी सहकारी व मा.एच.एम.दळवाई सर्वांबद्दल ऋण व्यक्त केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सर व मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन बुशरा चौगले मॅडम यांनी केले होते.
बज्म-ए-इमदादीयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ 27 नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न
