भरतशेठ गोगावले यांनी घेतली आमदारकीची शपथ

महाड, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व आमदारांचा शपथविधी सोहोळा दि. 7 ते 9 डिसेंबर दरम्यान बोलावलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात होत आहे. आज पहिल्याच दिवशी महाड विधानसभा मतदार संघातून चार वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे आमदार भरतशेठ गोगावले यांनी आमदारकीची शपथ घेतली.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाऊलावर पाऊल टाकीत आ. भरतशेठ गोगावले यांनी आपली आमदारकीची शपथ घेण्यापुर्वी छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण केले.

आता महाड वासियांसह रायगड जिल्हयातील शिवसैनिकांना आ. गोगावले हे मंत्रीपदाची शपथ कधी घेतात याची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

Share