मध्यरात्री घडली.

महाडकडून लोणेरे येथे स्कॉर्पिओ गाडी क्र. एमएच.06/बीसी 4041 मधून सहाजण जात असताना गुरूवारी रात्री 12.30 वा. चे सुमारास गाडीतील इंधन संपल्यामुळे वीर रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलावर उभी असताना पाठीमागून चिपळूणहून पनवेलकडे भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जाणाऱ्या टोइंग व्हॅन क्र. एच.14/सीएम. 309 ने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडी उड्डाणपुला लगतच्या

सर्व्हीसरोडवरून खाली जवळपास शंभर फूट अंतरावर शेतात फेकली गेली. या अपघातात स्कॉर्पिओ मधील सूर्यकांत सखाराम मोरे (वय-27), राहणार नवेनगर महाड, साहिल उर्फ ऋतिक नथुराम शेलार (वय-25) आणि प्रसाद रघुनाथ नातेकर (वय 25) दोघेही राहणार कुंभारआळी महाड या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून समीर सुधीर मुंडे (वय- 35) रा. दासगाव आणि सुरज अशोक नलावडे (वय-34), रा. चांभारखिंड महाड या दोन जखमींना पुढील उपचारार्थ मुंबई येथे हलविण्यात आले आहे तर शुभम राजेंद्र माटल (वय-27) रा. शिरगांव याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.


अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, पो. नि. जाधव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी टोइंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेतले असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.

Share