पुरार (रिजवान मुकादम )
कोकण वूमन फाउंडेशन माणगांव तालुक्यातील तसेच अनेक तालुका व जिल्ह्यातील घरगुती, स्वयं निर्मित खाद्य पदार्थ वस्त्र व वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंवर कलाकृती व इतर अनेक स्वयं व्यवसाय करणाऱ्या महिलांना आपल्या खाद्य पदार्थ व इतर अनेक स्वयं निर्मित व घरगुती पदार्थांची विक्री व्हावी व पदार्थ व वस्तुंना प्रसिद्धी देखील मिळावी व महिला स्वबलावर आर्थिक रित्या सक्षम व्हावे या अनुषंगाने कोकण वूमन फाउंडेशन च्या वतीने सतत पुढाकार घेत, अनेक प्रकारचे उपक्रम राबवून महिलांना आर्थिक रित्या सक्षम होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याने कोकण वूमेन्स फाउंडेशन ने माणगांव तालुक्यात आपला एक विशेष ठसा निर्माण केला आहे.
यावर्षी ही नूतन वर्षाच्या प्रथम दिनी बुधवारी १ जानेवारी रोजी संध्याकाळ च्या सुमारास मोर्बा माणगांव रोड शेजारी अलताफ धनसे ग्राउंड येथे कोकण वूमन फाउंडेशन च्या वतीने कोकण मेळा चे आयोजन करण्यात आले होते. कोकण मेळा मध्ये माणगांव तालुक्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील व इतर अनेक जिल्ह्यातील घरगुती व स्वयं निर्मित खाद्यपदार्थ व छोट्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून स्टॉल लावण्यात आले होते. कोकण मेला मध्ये अनेक प्रकारच्या घरगुती, स्वयं निर्मित खाद्यपदार्थ, मसाले, वस्त्र व इतर अनेक प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते… यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे आस्वाद घेण्यासाठी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिला,पुरुष व तरुण मंडली ने खूप गर्दी केली होती.. प्रत्येकी वर्षाप्रमाणे या वर्षी ही कोकण वूमन फाउंडेशन च्या वतीने आयोजित कोकण मेळा साठी जनतेचा उत्तुंग प्रतिसाद पहावयास मिळाला.
कोकण मेळा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी कोकण वूमन फाउंडेशन च्या संस्थापक अजिजा इम्तियाज, माजीदा ठाणगे, सह संस्थापक अफसरी बंदरकर, जिनत टाके, अध्यक्ष रिदा धनशे, उपाध्यक्ष जरीना कर्जीकर, नसरीन बंदरकर, सचिव अकबरी मापकर, व्यवस्थापकीय भागीदार रुबीना बंदरकर सबीहा बंदरकर या वूमेन्स कोकण फाउंडेशन च्या टीम ने कोकण मेळा सफल रित्या पार पडण्यासाठी अतिशय मेहनत घेतली होती.