राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत बालचित्रकार कु. जुवेरिया मुजफ्फर मुकादम प्रथम

महाड, मुलुंड येथील सुप्रसिद्ध संस्था रंग उत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्ती खुलवत त्यांना संधी देण्यासाठी कार्यशील असते. रंग उत्सव संस्थे मार्फत आयोजित राष्ट्रीय स्तरिय चित्रकला स्पर्धेत फजंदार हायस्कूल व जुनियर कॉलेज, वहूर महाड ची इ.7 वी ची विद्यार्थीनी कु.जुवेरिया मुजफ्फर मुकामद हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.रंग उत्सव संस्थेने तिला ह्या यशाबद्दल राष्ट्रीय स्तराचे प्रमाणपत्र व ट्राफी देऊन गौरविण्यात आले.

कु जुवेरिया हिचे अंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.कु. जुवेरिया हिला बालपणापासून चित्रकला विषयाची आवड होती. आपल्या कलेची जोपासना करत जिद्द, चिकाटी यांच्या जोरावर तिने राष्ट्रीय स्तरावर हे सुयश संपादन करून आपल्या शाळेचे,आपल्या आईवडिलांचे नाव रोशन केले.

या यशाबद्दल फजंदार हायस्कूल व जुनियर कॉलेज चे प्राचार्य राहिल फजंदार, पर्यवेक्षक गुलाम पटेल, कलाशिक्षक अब्दुल अजीज, इतर शिक्षकवर्ग शिक्षकेत्तर कर्मचाऱी विद्यार्थ्यांनी कु.जुवेरिया हिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share