श्रीवर्धन गारगोटी गाडी हिरकणी असल्याने प्रवाशांना भुर्दंड
श्रीवर्धन,(समीर रिसबूड)-गारगोटी आगाराकडून गारगोटी कोल्हापूर श्रीवर्धन गाडी सुरू करण्यात आल्याने श्रीवर्धन तालुक्यातील प्रवासी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.सदरची गाडी हिरकणी(लक्झरी)असुन प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने प्रवासी वर्गाने गारगोटी श्रीवर्धन गाडी लालपरी करावी अशी मागणी केली आहे. सकाळी आठ वाजता गारगोटी येथुन तर श्रीवर्धन येथुन सकाळी नऊ वाजता गारगोटी कडे मार्गस्थ होणारी गाडी ही महाड, पोलादपूर, महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर मार्गे रवाना होत असल्याने श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवाशांना सोयीस्कर झाली आहे व प्रवासी या गाडीचा फायदा ही घेत आहेत.
रगोटी आगाराकडून आता नियमित वेळापत्रकानुसार मार्गस्थ होणारी गाडी ही हिरकणी(लक्झरी)असून याचा भुर्दंड प्रवासी वर्गाला बसतोय.येथील प्रवाशांनी सदरची गाडी लालपरी असावी जेणेकरून सामान्य प्रवाशांच्या तिकीट दर आवाक्यात येईल.अशी मागणी गारगोटी आगार प्रमुखां कडे केली आहे. गारगोटी आगार प्रमुख अनिकेत चौगुले यांनी या बाबतीत प्रतिक्रिया देताना सांगितले की,सध्या गारगोटी आगारा कडे लालपरी गाड्यांची संख्या कमी आहे.मागणीनुसार पुढील महिन्यात लालपरी गाड्या गारगोटी आगारात दाखल झाल्यावर गारगोटी श्रीवर्धन ही गाडी लालपरी करण्यात येईल.