रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे
श्रीवर्धन, (रामचंद्र घोडमोडे) – श्रीवर्धन तालुक्यात अनेक पर्यटक दाखल होत असतात. तालुक्यात भटकंती करत असताना शहरातील समुद्र किनारा सुशोभीकरण करण्यात आला असुन याला पाहण्यासाठी अनेक पर्यटक समुद्र किनारी येत आहेत. परंतु बाजार पेठेतून समुद्र मार्गांवर जात असताना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठेत बँका समोर उभ्या असणाऱ्या ट्यूव्हिलर याला मुख्य कारण आहे. याबाबत संबंधित विभागाचे भय न राहिल्याचे पाहायला मिळते.
मुख्य रस्त्यावर अनेक छोट्या-मोठ्या व्यावसाईकांनी आपले व्यवसाय थाटाले आहेत हा सुद्धा वाहतूकीच्या दृष्टीने एक अडचणीचा मुद्दा आहे. श्रीवर्धन मध्ये जीवना जेटी बंदरावर होणारे मच्छी लिलाव याची होणारी वाहतूक बाजार पेठेतून होत असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. शालेय विद्यार्थी यांच्या येणाऱ्या सहली बसेस यांना शहरात प्रवेश बंद करत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक दोन किलोमीटर श्रीवर्धन बीच पर्यंत चालत जावे लागते. श्रीवर्धन शहरात महामंडळाच्या बसेस रात्री 8 नंतर येत असल्याने शहरातील नागरिकांना आर्थिक कळ सोसावी लागत असुन व्यापारी वर्गाचा किराणा माल घेऊन येणारा ट्रक उभा करायचा झाल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शहरात टू व्हीलर साठी सुद्धा पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याने टू व्हीलर सुद्धा उभे करण्याचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे सुद्धा वाहतुकीची समस्या निर्माण होते. याला मुख्य कारण म्हणजे शहरातील अरुंद असलेले रस्ते यावर तोडगा निघणे गरजेचे असुन मोठे वाहन समोरा समोर आल्यास वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून भविष्यात होणारी श्रीवर्धन शहराची वाढ पर्यटक संख्या यांचा विचार करता बाजार पेठेतील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.