मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मा. राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से) यांच्या उपस्थितीत
“संडे गार्डन” या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ दिनांक ०४ मे २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता ज्ञानज्योती
सावित्रीबाई ज्योतिबा फुले उद्यान (आरक्षण क्रमांक २६९), कनाकिया , मिरा रोड (पूर्व) येथे मोठ्या उत्साहात पार
पडला.

शुभारंग प्रसंगी उपायुक्त (मुख्यालय) श्रीम.कल्पिता पिंपळे, उद्यान प्रमुख नागेश वीरकर, सहाय्यक आयुक्त
प्रभाग ६ जितेंद्र कांबळे , इतर मनपा अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संडे गार्डन उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना तसेच नागरिकांना त्यांच्या कलागुणांना वाव
देऊन एक सादरीकरण व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या मागचा प्रमुख हेतू आहे. या पहिल्याच सत्रात
शहरातील आबालवृद्धांनी व स्थानिक कलाकारांनी नृत्य, गाणी, गायन मिमिक्री जादूचे प्रयोग अशा विविध कला
सादर करत संध्याकाळ खऱ्या अर्थाने रंगतदार केली.
आजच्या संध्याकाळी अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली पण कार्यक्रमाला रंगत आणली ती
जादूगर स्वरांग रणदिवे या १४ वर्षीय जादुगाराने .त्याने आपल्या अप्रतिम जादुई खेळाने सगळ्या उपस्थित
नागरिकांना मंत्रमुग्ध केले
संडे गार्डन हा उपक्रम दर रविवारी आयोजित केला जाणार असून, नागरिकांच्या सहभागातूनच मिरा
भाईंदरच्या सांस्कृतिक कलागुणांना अधिक चालना मिळणार आहे असा विश्वास मनपा प्रशासनाला आहे. यापुढे
प्रत्येक रविवारी म्हणजेच ११मे ला सालासार हनुमान उद्यान भाईंदर (पश्चिम) १८ मे ला जेसल पार्क चौपाटी
भाईंदर( पूर्व)आणि २५ मे २०२५ ला आरक्षण क्रमांक २४२ रामदेव पार्क येथे संडे गार्डनचे पुढचे सत्र असणार आहे
.
विद्यार्थांना आता मे महिन्यांतील उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे दर रविवारी मिरा भाईंदर शहरातली अनेक
उद्याने लहानापासून वयोवृद्ध नागरिकांनका पर्यंत भरलेली असतात अशाच जर उपस्थित कलाकार आणि
नागरिकांना असे व्यासपीठ मिळाले तर मनोरंजन तर होईलच पण त्यासोबत त्यांच्या कलागुणांना वाव ही मिळेल
यासाठी खास संडे गार्डनचे आयोजन केले आहे.अशा भावना यावेळी आयुक्तांनी व्यक्त केल्या. मिरा भाईंदर
शहरातील नागरिकांनी तसेच कलाकारांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत या पुढची सगळी सत्र अशीच यशस्वी करावी
असे आवाहन मिरा-भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांनी केले
आहे.