सामाजिक सभागृहाला लागणारा निधी देणार!

निजामपूर तळेआळी येथील सभागृहाच्या उद्घाटनात ना. भरत गोगावलेंची ग्वाही

माणगाव (सलीम शेख)निजामपूर तळेआळी येथील नागरिकांनी सामाजिक सभागृहाची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून शासनाच्या पर्यटन विकास मंडळाच्या निधीतून 15 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन रोजगार हमी योजना, फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री ना. भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी ना. गोगावले म्हणाले की या सामाजिक सभागृहाला लागणारा उर्वरित कामासाठीचा निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

निजामपूर तळेआळी येथील सभागृहाचे उद्घाटन मंत्री ना. भरत गोगावले यांच्या हस्ते ता. 19 जानेवारी, रविवारी सायं. 5.00 वाजता करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे, युवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश नलावडे, शिवसेना समन्वयक नितीन पवार, युवासेना सचिव अच्चुत तोंडलेकर, युवासेना तालुकाप्रमुख राजेश कदम, युवासेना तालुका संपर्क प्रमुख संतोष पोळेकर, निजामपूर विभाग प्रमुख मनोज सावंत, माजी विभाग प्रमुख गणेश समेळ, माजी सरपंच बाळाराम दबडे, हमजाभाई जालगावकर, शहरप्रमुख गणेश पवार, उपशहर प्रमुख नितीन बडे, ज्येष्ठ सल्लागार मारुती कासार, महिला संघटिका सोनल विचारे, ग्रामीण पं. सदस्या अंकिता खेडेकर, राजश्री निजापकर, यांच्यासह ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.

यावेळी ब्राम्हण समाज, निजामपूर ग्रामपंचायततळेआळी ग्रामस्थांच्या वतीने ना. गोगावले यांचा सत्कार करण्यात आला.

Share