स्वच्छता अभियान ही आता एक लोक चळवळ झाली आहे: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

स्वच्छता अभियान ही आता एक लोक चळवळ झाली आहे;असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले.

“स्वच्छता ही सेवा 2024” मोहिमेचा एक भाग म्हणून आज नवी दिल्ली येथे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देताना गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा परिवर्तनात्मक प्रभाव अधोरेखित केला. यामुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळाली असून राष्ट्राच्या भविष्यालाही आकार देत आहे.  

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या पहिल्या भाषणादरम्यान स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केल्याला आता 10 वर्षे होऊन गेली आहेत, असे गोयल यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, तसेच अमेरिका आणि इजिप्तमधील प्रतिष्ठित पाहुण्यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

Share