पोलादपूर – धनराज गोपाळ
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात महामार्गावर बोगदा भोगाव हद्दीत गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने महामार्ग प्रशासन व एल अँड टी प्रशासनाकडून कशेडी बोगदा मार्गे शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास वाहतूक बंद करण्यात आली होती.
कशेडी बोगदा मार्गे जाणाऱ्या नवीन मार्गावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक जुन्या मार्गावरून वाहतूक कशेडी बंगला मार्गे वळवून चालू करण्यात आली होती.
मात्र या मार्गावरील एका मार्गीकेचे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने बुधवार रोजी रात्री १२ वाजता कशेडी बोगदा सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर कुंभार व श्री रामागडे यांनी दिली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा या नवीन मार्गावरून एसटी सह ट्रक टेम्पो कार सह अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आली आहे.
कशेडी बोगदा मार्गे वाहतूक सुरू झाल्याने वेळे सह इंधनाची बचत होऊन प्रवासही सुसाट होत असल्याने सर्वच वाहन चालक या मार्गाने जाणे पसंत करतात त्यामुळे जुन्या महामार्गावरील रहदारी कमी झाली आहे. जुन्या मार्गावरील कशेडी बंगला पंचक्रोशी येथील स्थानिक नागरिक व प्रवाशांना जाण्या येण्यासाठी वाहने मिळत नसल्याने या विभागातील प्रवाशांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. किमान चिपळूण ,खेड व महाड आगारातील एसटी बसेस या कशेडी बंगला मार्गे सोडण्यात याव्या अशी मागणी या विभागातील नागरिकांकडून केली जात आहे.