महाड -दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून सर्व प्रकारे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन महाडचे तहसीलदार श्री महेश शितोळे यांनी दिले .चवदार तळ्या वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह महाड येथे अपंग क्रांती संस्था
व संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्था , लायन्स क्लब महाड, मुक्तांगण दीव्यांग मुलांची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाड पोलादपूर प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री फैज हुर्जूक,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेश शितोळे, प्रमुख पाहुणे महाड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारीश्री. नामदेव कटरे , महाड लायन्स क्लब अध्यक्षा डॉक्टर श्रीमती मंजुषा कुद्रीमोती, समाजसेवक श्री.बाबूलाल जैन, महाड शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री.संदीप पाटील, नगरपालिकेचे दिव्यांग विभाग प्रमुखश्री. दीपक महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात तहसीलदार महेश शितोळे यांनी आजचा कार्यक्रम हा बहुसंख्येने होत असल्याचे सर्व अपंग बंधूंचे आभार मानून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अपंग दिनाचे औचित्य साधून प्रत्येक निधीचे वाटप आणि शासनाच्या योजना याचा लाभअपंग बंधूंनी कसा घ्यावा याबाबत थोडक्यात माहिती देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रथम मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्या नंतर महाड-पोलादपूर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्यासपीठावरील इतर मान्यवरांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुक्तांगण दीव्यांग मुलांची शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
नगरपालिकेचे दिव्यांग विभाग प्रमुख श्री. दीपक महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना महाड नगरपालिका हद्दीत एकूण 140 दिव्यांग व्यक्ती असून 130 जणांना निधी वाटप करण्यात आल्याचे सांगितले.महाड नगर परिषदेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते काही दिव्यांग बंधूंना धनादेशाचे वाटप करण्यात आले .
महाड पोलादपूर प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री. फैज हुर्जूक यांनी महाड नगर परिषदेच्या वतीने अपंग बंधूंना पाच टक्के अपंग निधी वाटप करण्यात येत असल्याचे सांगून संघटनेच्या वतीने श्री. दीपक महाडिक यांचे आभार मानले त्याचप्रमाणे महाड तालुक्यातील 134 ग्रामपंचायत पैकी काही ग्रामपंचायती अपंग निधीचे वाटप करत नाहीत याबाबत नाराजी व्यक्त केली. महाड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. नामदेव कटरे यांनी महाड तालुक्यातील पंचायत समितीच्या वतीने प्रत्येक अपंग बांधवांना अपंग निधीचे वाटप करण्यात येईल व तालुक्यातील 134 ग्रामपंचायत पैकी ज्या ग्रामपंचायती अपंग निधीचे वाटप करत नाही त्यांना आमच्या वतीने प्रत्येक अपंग बांधवांना अपंग निधीचे वाटप करण्याचे आदेश देण्यात येतील असे सांगुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री संदीप पाटील यांनी आजच्या कार्यक्रमाचे भव्य आणि दिव्य आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून आपणास अपंग कोण म्हणेल आपण तर सदृढ आणि निश्चय व्यक्ती दिसता आजचा कार्यक्रम हा सर्वांचा आनंदाचा दिवस असल्याचे सांगुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी महाड लायन्स क्लब अध्यक्षा डॉक्टर श्रीमती मंजुषा कुद्रीमोती, समाजसेवक श्री.बाबूलाल जैन यांनी पण आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन श्री इकबाल देशमुख यांनी केलेयावेळी दिव्यांग अपंग बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.या कार्यक्रमाला यश्सवि करण्यास संघटनेचे पदाधाकारी इम्रान सावंत, आरती सुगदरे,कृष्णा लाड, दिलीप पवार, सबापरविन वारोसे, मोहसिन दरेखान, सनिल जंगम, मंजुषा साबळे यांनी मेहनत घेतली.