चवदारतळे सुशोभिकरण व भीमसृष्टी साकारण्यास प्राधान्य देणार : आ. गोगावले

महाड, (प्रतिनिधी) -आज महापरिनिर्वाण दिना निमित्त चवदार तळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आ. भरतशेठ गोगावले यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.

यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आ. भरतशेठ गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील महायुती सरकारच्या कारकिर्दीत चवदार तळे सुशोभिकरणासाठी 7 कोटी, राजर्षी शाहू महाराज सभागृहासाठी 3 कोटी मंजुर केले असून हे काम गतीने पुर्ण करण्यास आपले प्राधान्य राहील याच बरोबर महाड येथे शिवसृष्टीच्या धर्तीवर भीमसृष्टी करण्याचा आपला प्रयत्न असेल असे गोगावले यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनी नागपुर येथील दिक्षाभुमी व दादर येथील चैत्यभुमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची सर्व व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात आली आहे. 20 मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासनातर्फ मानवंदना देण्याची प्रथा आपण सुरु केली आहे ती भविष्यात अखंडपणे सुरु राहणार आहे. महायुती सरकारच्या मागील अडीच वर्षाच्या काळात समाज कल्याण विभागा कडुन दिल्या गेलेल्या निधीतून प्रत्येक बौद्धवाडीत बुद्ध विहार बांधण्याचा आपण संकल्प केला असून 80 टक्के गावातून हे काम झाले असून उर्वरित गावांमध्ये येणाऱ्या काळात बुद्ध विहार बांधण्यात येतील. महायुती सरकार कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी चांगली कामे व या ठिकाणी भेट देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून एक चांगला आदर्श ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल असे आ. गोगावले यांनी सांगितले.

Share