युगप्रवर्तक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा राजमाता जिजाऊ माँ साहेब आदर्श महिला पुरस्कार डॉ. शितल मालुसरे यांना जाहीर

महाड, (प्रतिनिधी) – युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, महाडमधील शिक्षिका डॉ. शितल शिवराज मालुसरे यांना राजमाता जिजाऊ माँ साहेब आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाला आहे.

युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने २००५ पासून राजमाता जिजाऊ माँ साहेब आदर्श महिला पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श महिला पुरस्कारस्वामी विवेकानंद आदर्श युवा उद्योजक पुरस्कार दिला जातो. यावर्षी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या १२ व्या वंशज, महाड मधील शिक्षिका डॉ. शितल शिवराज मालुसरे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी दिली.

तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श महिला पुरस्कार वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या कार्यकर्त्या सौ. नीता सयाजी गायकवाड शिरूर यांना जाहीर झाला आहे. तसेच स्वामी विवेकानंद आदर्श युवा उद्योजक पुरस्कार आंबेगाव तालुक्यातील थोरात ॲण्ड लोले ऍग्रोफूड कंपनी, निरगुडसरचे युवा उद्योजक श्री. शैलेश थोरात व श्री. पोपट लोले यांना जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा राज्याचे मा. गृहमंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२५ रोजी देण्यात येणार असल्याची माहिती खरात यांनी दिली.

4o

Share