मित्रांनो, गेले काही महिने आपण युपीएससी च्या नागरीशास्त्र स्पर्धा परीक्षच्या दृष्टीने चर्चा केली त्यामध्ये पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा, मुलाखत या टप्प्यातून ही परीक्षा घेतली जाते. प्रारंभिय पूर्व परीक्षेचे स्वरूप, प्रश्न संख्या परीक्षेचे माध्यम इत्यादी विषयाची माहिती घेतली. आज आपण पेपर चारचा अभ्यासक्रमाचा सारांश आढावा घेऊया. तत्पूर्वी इथे नमूद करणे गरजेचे आहे कि कदाचित 22 जानेवारी रोजी जाहिरात प्रसिध्द झालेली असेल त्यामध्ये एकूण किती जागासाठी ही परिक्षा घेतली जाणार आहे याचा उल्लेख असेल. पूर्व परिक्षेया दिनांक व इतर तपशीलवार माहिती असेल. त्या बद्दल आपण पुढील आठवड्यात आढावा घेऊ. आज मात्र मुख्य परिक्षेचा पेपर चारचा अभ्यासक्रम व प्रश्नाचे स्वरूप याची माहिती घेऊया.
मुख्य परीक्षेचा पेपर चार (सामान्य अध्ययन) बद्दल पाहूया, मागील लेखात आपण नातिशास्त्र नैसर्गिक क्षमता, ससोटी हे मुद्दे पाहिले. या पेपरच्या अभ्यासक्रमात नातिशास्त्र आणि मानवी संबंध असा अभ्यासक्रमातील मुद्दा पाहिला. या उपघटकावर प्रश्न कशा प्रकारे विचारले गेले होते ते पाहू या.
प्रश्न – सामाजिक आणि मानवी कल्याणामध्ये नीतिशास्त्र कशा प्रकारे योगदान देते हे स्पष्ट करा.
प्रश्न – सध्याच्या इंटरनेटच्या विस्ताराने नव्या प्रकारची सांस्कृतिक मूल्ये रूजवली जी बऱ्याचदा पारंपारिक मूल्यांशी विसंगत असतात चर्चा करा.
प्रश्न- फरक स्पष्ट करा. व्यक्तिगत नैतिकता आणि व्यावसायिक नैतिकता.
प्रश्न – जीवनातील नैतिक वर्तनासंदर्भात तुम्हाला सर्वात जास्त प्रेरित करणारे प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोण आहे? त्याच्या किंवा तिच्या शिकवणीचे सार सांगा. विशिष्ट उदाहरणे देऊन तुम्ही स्वतःच्या नैतिक विकासाकरिता त्या शिवणीचा जीवनात कशाप्रकारे अंगीकार करू शकला आहात ह्याचे वर्णन करा.
अभिवृत्ती व उपघटावर खालील प्रकारे प्रश्न विचारले गेलेत. काही नमूना म्हणून प्रश्न बघुया.
प्रश्न – सार्वजनिक सेवकांद्वारे त्याच्या कामाप्रती नोकरशाहीवादी दृष्टीकोन आणि लोकशाहीवादी दृष्टीकोन असे दोन नेमके दृष्टीकोन दर्शविले जातात, असे दिसून येते.
प्रश्न -सतत अत्यंत तणावाखाली काम करावे लागणाऱ्या नागरी सेवकांच्या बाबतीत सकारात्मक कृती गुण समजला जातो. व्यक्तिमध्ये सकारात्मक कृती कोणत्या घटकांमुळे तयार होते?
नैसर्गिक क्षमता व नागरिसेवा या उपघटकांस खालील प्रमारे प्रश्न विचारले गेलेत.
प्रश्न-प्रशासकीय सेवेच्या संदर्भात खालील बाबीच्या प्रासंगिकतेचे परीक्षण करा.
अ) पारदर्शकता ब) उत्तरदायित्व) क) न्याय व निष्पक्षता, ड)ठाम राहण्याचे धैर्य, इ) सेवेप्रति निष्ठा
प्रश्न- पाच नैतिक गुण कोणते, ज्यांच्या आधारे नागरी सेवकांच्या कामगिरीचे आकलन होऊ शकेल. या गुणांच्या समावेशाचे समर्थन द्या.
वस्तुनिष्ठता – या उपघटकावर प्रश्न असे प्रश्न
प्रश्न – खालील मुद्यावर तीस शब्दात टिप लिहा.
कर्तव्यनिष्ठा – भावनिक बुध्दिमत्ता – या-उपघटकावर खालील प्रमाणे प्रश्न गेलेत.
प्रश्न-द्व्ोषाची भावना व्यक्तिचे शहाणपण आणि सदसदविवेक बुद्धी चा घात करणारी असून ती राष्ट्राचे चैतन्य विषारी बनवते. या दृष्टी कोणाशी तुम्ही सहमत आहात का
प्रश्न- यश, चारित्र्य, आनंद आणि चिरकाल टिकणाऱ्या कार्यपूर्ती यासाठी खरोखर महत्वाची गोष्ट म्हणजे भावनिक कौशल्याचा एक निश्चिित संच तुमया ई क्यू केवळ पारंपारिक आय. क्यू चाचण्याव्दारे मोजल्या जाणाऱ्या पूर्णपणे आकलनात्मक क्षमता नाहीत. या मताशी तुम्ही सहमत आहात का? तर्काच्या आधारे तुमच्या उत्तराचे समर्थन करा.
प्रश्न -तुमच्या नैतिक भूमिकेशी तडजोड न करता, सदसदविवेकचा पेच प्रसंग सोडवण्यासाठी भावनिक बुध्दिमत्ता मदत करते का?परीक्षण करा.
भारत व जगातील नैतिक विचारवते-
प्रश्न- एखाद्या देशाला भ्रष्टाचारमुक्त आणि सुंदर विचाराचे राष्ट्र बनवायचे असेल तर मला असे वाटते की तीन प्रमुख सामाजिक सदस्य हे बदल घडवू शकतात ते म्हणजे आई, वडील, आणि शिक्षक एपीजे अब्दुल कलाम, याच्या विधानाचे विश्लेषण करा.
प्रश्न- दुसऱ्याच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून देणे हाच स्वतःला जबण्याचा सर्वोतम मार्ग आहे. महात्मा गांधी
प्रश्न- प्रत्येक कार्यास यशस्वी होण्याआधी शेकडो अडचणींना तोंड द्यावे लागते. जे धीर धरतात त्याना उशिरा का होईना प्रकाश दिसेल – स्वामी विवेकानंद
सार्वजनिक – नागरिक सेवेतील मूल्ये आणि लोक प्रशासनातील नितिशास्त्र प्रश्न पाहूया.
प्रश्न- हितसंबंधात्मक संघर्ष म्हणजे काय? वास्तविक आणि सभाव्य हितसंबंधात्मक संघर्ष यामधील फरक उदाहरणासहित स्पष्ट करा.
प्रश्न – नैतिक दुविद्येचे समाधान करतेवेळी नागरी अधिकाऱ्याकडे आपल्या कार्यक्षेत्राच्या ज्ञानाशिवाय कल्पकता आणि उच्च कोटीची सर्जनशिलता देखील आवश्यक असते. उदाहरणे देऊन 2508 करा.खाजगी जाणि शासकीय संस्थामधील नैतिक व्दिधाआणि चिंता.
प्रश्न – नैतिक द्विधेचे समाधान करते वेळी नागरी अधिकाऱ्याकडे आपल्या कार्यक्षत्राच्या ज्ञानाशिवाय कल्पकता आणि उच्च कोटीची सर्जनशीलता देखील आवश्यक आहे विवेचन करा.
वरील घटक – उपघटकावर काही प्रश्नाचे वनकप कुसे आहे. ते लक्षात यावे म्हणून दिले आहे. पेपर चारच्या विविध घटकांवर प्रश्न पाहू शकता. त्याकरीता बाजारात प्रश्न सचिका उपलब्ध आहे. वरील घटक सोडून कायदे, नियम, नियमन, उत्तरदायित्व, राज्यकारभार, आंतरराष्ट्रीय संबंध, प्रशासनावरील सचोटी नागरी सेवा संकल्पना, कंपन्याचा कारभार माहितीचा अधिकार, आचार संहिता, सेवा, नागरिकाची सनद, सार्वजनिक नीधीचा वापर, भ्रष्टाचार एक आव्हान, शासनामधील माहितीची देवाण घेवाण. इत्या.या सर्व अभ्यासक्रमावर आज पर्यंत विचारले गेलेले प्रश्नांचा अभ्यास करावा, म्हणजे प्रश्नाचे स्वरूप समजून उत्तर कसे असावे ते सुध्दा अभ्यास गरजेचे आहे. चार पेपर मध्ये केस स्टडी या घटकाचा देखील अभ्यास करावा.यापुढे आपण जाहिरात प्रसिद्ध झालेली असेल तर युपीएससी. च्या संकेत स्थळावर भेट द्यावी व वेळ न घालवता फॉर्म भरावा.
अ. रऊफ खतीब
शैक्षणिक समुपदेशक
खेड – रत्नागिरी