मित्रानों दरवर्षी संघ लोकसेवा आयोगा मार्फत नागरीशास्त्र परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध होण्याची भारतातील लाखाच्या संख्येने तरुण-तरूणी प्रतिक्षा करतात. ती परीक्षा समीप ठेपली आहे. त्या दृष्टीने या स्तंभात आपण सारांशरूपी रूपरेषा पाहिली आहे. युपीएससी. च्या नागरीशास्त्र परीक्षा या तीन टाप्यात घेतल्या जातात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या पैकी पूर्व परिक्षेच्या दुष्टीने महत्वाच्या बाबींवर चर्चा करुया. हा लेख प्रसिद्ध होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाली असेल कृपया …. या संकेत स्थळावर जाऊन पूर्व परीक्षेचा दिनांक एकूण किती पदाकरीता परीक्षा घेतली जाणार आहे. त्याचा तपशील पहावा.
आज आपण पूर्व परीक्षेच्या स्वरुपा बद्दल चर्चा करुया 2025 ची पूर्व परीक्षा 25 मे ला होणार आहे. सदर परिक्षा….. स्वरुपाची असते. इतर तपशील खालील प्रमाण आहेत.
- कोणत्या पदाकरीता परीक्षा घेतली जाते – आय. ए. एस. आय. पी. एस., आय, एफ. एस. व इतर उच्च पदाकरीता घेतली जाते त्या करीता भारतीय नागरीकत्व आवश्यक आहे.
- शिक्षण – कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी.
- अर्ज करताना पदवीच्या अंतिम वर्षातील उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र मुख्य परीक्षेच्या आधी पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.) वय- ओपन 21 32
- इडब्ल्यु एस. 21 ते 32
- ओ. बी.सी. 21 ते 35
- एस. सी./ एस. टी. 21 ते 37
- पीडब्ल्यु. बीडी 21 ते 42
- एक्स सर्व्हीसमेन 21 ते 37
- इसीओएस /एसएससीओ
- पूर्व परीक्षा दोन पेपरवर आधारीत आहे.
पेपर जनरल स्टडीज (जीएस)
पेपर सिव्हील सर्व्हीसेस एप्टीट्यूड टेस्ट)
वरील दोन पेपर पैकी जी. एस. चे गुण गुणवत्ता यादीसाठी ग्राहृय धरले जातात.
गुण जी. एस. चा पेपर हा 200 गुणांचा असतो.
प्रश्न – जी. एस. पेपर मध्ये प्रश्न संख्या 100 असते.
सीसॅट – सीसेंट चा पेपर देखील 200 गुणांचा असतो. सीसेंट पेपर मध्ये एकूण 80 प्रश्न असतात.
वेळ – वरील दोन्ही पेपर हे प्रत्येकी दोन तासाचे असतात नकारात्मक गुण – दोन्ही पेपरमध्ये नकारात्मक गुण पध्दती आहे.
संधी -उमेदवाराला किती वेळा (Attemots) ही परीक्षा देता येते. ओपन व ईडब्ल्यूएस सहा वेळा
एस.सी./ एस.टी. – मर्यादा नाही
ओबीसी – नऊ वेळा
पीडब्ल्यूबीटी – ओपन / इडब्ल्यूएस/ओबीसी. नऊ
एससी/एस.टी. मर्यादा नाही.
युपीएससी.च्या पूर्व परीक्षेत जे दोन पेपर आहेत. अनु. जनरल स्टडीज (जी. एस.) व सीसेंट, यांच्या अभ्यासक्रमा विषयी माहिती घेऊया.
पेपर क्र. 1 – जी. एस. - भारताचा व भारतीय राष्ट्रीय युवक चळवळ
- आतरराष्ट्रीय घाडामोडी.
- भारताचा व जगाचा भूगोल
*भारतीय राज्यघटना- प्रशासन यामध्ये संविधान राजकीय व्यवस्था, पंचायती राज, अधिकार, नागरी धोरण सामान्य ज्ञान. - आर्थिक सामाजिक विकास दारिदय, शाश्वत विकास, समावेशन
- पर्यावरण परिस्थिती की, जैवविविधता व वातावरणातील बदल.
वरील विषयाचा अभ्यास सखोल व विस्तृत असा करणे आवश्य आहे.
पेपर क्र. 1 च्या अभ्या करीता एन.सी. ई. आर.टी. ची पुस्तके वाचावीत. तसेच वर्तमान पत्रे देखील नियमित वाचावीत. बाजारात असंख्य संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. ती प्राप्त करावीत किंवा वाचनालयात असल्यास प्राप्त करवीत.
पेपर क्र. 2 सीसेंट – सदर पेपर हा पात्रता पेपर आहे या पेपरचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे. - आकलन comprehension
- संवाद कौशल्यावर परस्पर कौशल्ये – communication shilts
निर्णयक्षमता व समस्या निवारण – Desision making and problem solving
सामान्य मानसिक क्षमता –
General Mental Ability
तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता – logical Reasoning and Analytical Abilty
मूलभूत अंकगणित – Basis numeracy विदा- चार्टस आलेख – Data chaits Graphi etc/
अशा प्रकारे पूर्व परिक्षेचेे हे दोन पेपर्स आहेत. दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम पाहता आपण फक्त घटका बद्दल पाहिले आहे. मात्र इथे है विसरून चालणार नाही की प्रत्येक पघटक हा अत्यंत महत्वाचा असून त्या करीता भरपुर वाचन करणे आवश्यक आहे. त्याकरिता अभ्यासक्रमावर आधारीत पुस्तकाचा अभ्यास करावा लागेल सीसेंट हा पेपर पात्रता पेपर असला तरी दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक घटक, उपघटक, पेपर हा अत्यंत महत्वाचा आहे. हे विसरून चालणार नाही. पूर्व परिक्षा में महिन्यात होणार आहे. त्यामुळे तीन ते साडेतीन महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्याचा योग्य तो उपयोग करून घ्यावा लागेल. अभ्यासक्रमाचे वेळापत्रक बनवावे लागेल.तर मित्रानो, फॉर्म भरणे व इतर सविस्तर माहितीसाठी आज Upsc org. in वर भेट द्या व परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाला लागा.
अ. रऊफ खतीब
शैक्षणिक समुपदेशक
खेड – रत्नागिरी