awazadmin

बोर्ड परीक्षेत इंग्लिश विषयात 90 हून अधिक गुण मिळवण्यासाठी उपयुक्त टिप्स

भाषा विषयात 100 पैकी 100 गुण मिळविणे अशक्य आहे. पण सर्वोत्तम /उच्चांकी गुण प्राप्त करणे मुळीच अवघड नाही. भाषा विषयाचा पेपर लिहिताना विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचा कस लागतो. स्वच्छ, सुंदर, नीटनेटके आणि स्पष्ट लेखन आवश्यक आहे. गणित, विज्ञान, या सारख्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणे फार सोपे आहे कारण अशा विषयात शुद्धलेखन काटेकोरपणे तपासले जात नाही. पण इंग्लिश विषयात शब्दांचे स्पेलिंग, व्याकरण, वाक्यरचना, मांडणी इत्यादी साऱ्याच बाबी विचारात घेतल्या जातात. 10 वी / 12 वी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना इंग्लिश विषयात 90 हून अधिक गुण प्राप्त करता यावेत यासाठी मी उपयुक्त टिप्स देत आहे.

  1. पाठ्यपुस्तकाचा सखोल अभ्यास करा – पाठ्यपुस्तकातील सर्व धडे आणि कवितांचा अर्थ, महत्त्वाची वाक्ये, आणि धड्याचा आशय विषय नीट समजून घ्या. प्रत्येक धडा आणि कवितेच्या खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नाची मुद्देसूद उत्तरे वाचा, पाठांतर करा. (अधिक माहितीसाठी आवश्यकता भासल्यास गाईडचा वापर करायला हरकत नाही.)
  2. व्याकरण अभ्यास -व्याकरणाचा अभ्यास सखोल आणि व्यवस्थित करा. यामध्ये प्रामुख्याने Parts of Speech, Tenses, Active & Passive Voice, Direct & Indirect speech, Degree, Frame Wh questions, Clause Analysis, Sentence Transformation etc. यावर विशेष भर दिला पाहिजे.
  3. लेखन कौशल्ये – निबंध लेखन आणि पत्रलेखनाच्या बाबतीत महत्त्वाच्या विषयांवर निबंध आणि औपचारिक व अनौपचारिक पत्रलेखनाचा सराव करा. निबंध लेखन आणि पत्र लेखन करताना प्रभावी आणि परिणामकारक सुरुवात, 2 – 3 परिच्छेद मुद्द्यांना अनुसरून लिहावेत. निबंध आणि पत्र लेखनाचा शेवट उत्तम असायला हवा. प्रत्येक मुद्दा स्पष्ट व्हायला हवा.
  4. रचनात्मक लेखन: Story writing, Report writing, Dialogue writing, Interview Questions यांचाही सराव करा. त्यासाठी प्रस्तावना (Introduction) आणि निष्कर्ष (Conclusion) चांगली व आकर्षक प्रस्तावना आणि प्रभावी निष्कर्ष लिहिण्यावर भर द्या.
  5. वाचन कौशल्य सुधारणा : परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या उताऱ्यावरील प्रश्नांसाठी गद्य आणि पद्याचे तुकडे वाचून त्यांचा अर्थ समजून घेण्याचा सराव करा. यामध्ये factual, inference, personal response, complex, global understanding, Grammar, Vocabulary यावर आधारित प्रश्नांची उत्तरे यांचा पुरेपूर सराव करणे आवश्यक आहे.
    विशेष सूचना अशी आहे की विद्यार्थ्यांनी प्रश्न समजून घेऊन उत्तर लिहावे. प्रश्न अचूक समजून घ्या आणि अपेक्षितच उत्तर लिहा.
    पेपर सॉल्विंग टेक्निक्स
  6. टाइम मॅनेजमेंट – वेळेचे योग्य नियोजन करा. आधी सोपे आणि नंतर कठीण प्रश्न सोडवा. कोणताही प्रश्न दुर्लक्षित राहू नये. उत्तरे लिहिताना प्रश्न आणि उप प्रश्न क्रमांक अचूक लिहा.
  7. स्पष्ट आणि स्वच्छ लिखाण – लेखन स्वच्छ आणि सुवाच्य ठेवा. योग्य ठिकाणी मथळे आणि उपमथळे द्या. आवश्यक ठिकाणी विशिष्ट शब्द अधोरेखित करू शकता.
  8. प्रत्येक उत्तर तपासा -उत्तर लिहून झाल्यावर ते पुन्हा एकदा वाचून पहा. खात्री करून घ्या की उत्तर समर्पक आहे.
  9. वाचन आणि शब्दसंग्रह नवीन शब्द शिका – दररोज 5 ते 10 नवीन शब्द आणि त्यांचे अर्थ, समानार्थी शब्द, आणि विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवा.5. Idioms आणि Phrases महत्त्वाच्या म्हणी आणि वाक्प्रचारांचे अर्थ आणि उपयोग समजून घ्या. त्यांचा परिपूर्ण आणि अर्थपूर्ण वाक्यात उपयोग करता आला पाहिजे.
  10. नियमित सराव आणि सातत्य ठेवा – दररोज 1 ते 2 तास इंग्रजीचा अभ्यास करा. मागील वर्षांचे प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून सराव करा.
  11. प्रभावी नोट्स तयार कराव्या -करणाच्या नियमांचे आणि महत्त्वाच्या उत्तरांचे छोटे नोट्स तयार करा. परीक्षेआधी जलद पुनरावलोकनासाठी त्या नोट्सचा उपयोग करा.9. विषय तज्ञांचा/ शिक्षकांचा सल्ला घ्यातुम्हाला जे प्रश्न समजत नाहीत, त्याबद्दल शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्या. किंवा मार्गदर्शक पुस्तके वापरून तुमचा सराव वाढवा.
  12. आत्मविश्वास ठेवा -परीक्षेच्या वेळेस घाई न करता आत्मविश्वासाने पेपर सोडवा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.
  13. प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट समजून घ्या – पेपरचे स्वरूप समजून घ्या (Section A: Reading, Section B: Writing, Section C: Grammar, Section D: Literature).प्रत्येक विभागासाठी वेगळी रणनीती तयार करा.नियमित सराव, सातत्य, जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वासामुळे तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता! सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!

संभाजीराव सूर्यवंशी
प्राचार्य, आयडीयल इंग्लिश स्कूल, शेख हुसेन काझी इंग्लिश हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज, महाड – रायगड

रोजगार, स्वयंरोजगारावर भर हवाच !

परवा महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेचा विषय महाड महोत्सवाचे आयोजन असला, तरी त्यानंतर विविध विषयांवर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. आपल्याला जी खाती मिळाली आहेत, त्या खात्यांचा वापर रोजगारांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी कसे करता येईल, यावर ते या अनौपचारिक चर्चेत भरभरून बोलले.रोजगार हमी आणि फलोत्पादन या खात्यांचा कार्यभार स्विकारल्यानंतर ना. गोगावले यांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असलेल्या एका आदिवासी पाड्याला भेट दिली. त्या पाड्यावर एका शिक्षकाने क्रांती घडवून आणली आहे. पावसाळ्यानंतर शाळेत विद्यार्थी येत नाहीत याचे कारण शोधण्याचा प्रयत्न जेव्हा या शिक्षकाने केला तेव्हा त्याच्या निदर्शनास आले की , पावसाळ्यात येथील आदिवासी समाज रोजगारासाठी स्थलांतरीत होतो. स्थलांतरीत होताना ते आपल्या मुलांनाही घेवून जातात.

त्यामुळे त्यांची शाळा सुटते.केवळ कारण जाणून घेवून हे शिक्षक थांबले नाहीत. स्थलांतर थांबले तर विद्यार्थ्यांची शाळा सुटणार नाही यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शासनाच्या योजनांचा आधार घेत त्यांनी या आदिवासींना फुलोत्पादन , फलोत्पादन आणि मत्स्यशेतीकडे वळविले. आज तेथील आदिवासी 1400 रुपये किलो या दराने मोगऱ्याची फुले, काकडी आणि शेततळ्यात माशांची पैदास करून त्यांची विक्री करित आहेत. आपोआप त्यांचे स्थलांतर थांबले आहे आणि मुलेही नियमितपणे शाळेत येवू लागली आहेत.या शिक्षकाने एका आदिवासी पाडयावर शासकीय योजनांचा प्रभावीपणे वापर करुन स्थलांतर रोखले आणि तिथली बदललेली परिस्थिती पाहून ना. भरतशेठ गोगावले भारावून गेले आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर महाडमधला आदिवासी समाज आला जो पावसाळ्यानंतर वीट भट्टी किंवा अन्य ठिकाणी काम करण्यासाठी स्थलांतरित होत असतो. अगदी परराज्यातही तो जात असतो.

स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्याने तरुण वर्गाचेही महानगरांमध्ये स्थलांतर होत असते. या योजनांचा लाभ जर स्थलांतरीत होणाऱ्या आदिवासी आणि स्थानिक तरुणांना मिळाला तर त्यांचे स्थलांतर रोखता येईल त्या साठी त्यांना मेहनत करण्यासाठी उद्युक्त करावे लागेल हा विचार ना. गोगावले यांच्या मनात डोकावला आहे.त्यासाठी गावागावात कार्यकर्त्यांची एक टीम तयार करुन ते आदिवासी आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या कशा आणि किती संधी उपलब्ध आहेत याची जाणीव करून देण्याच्या कामाला प्रारंभ करणार आहेत. हे काम करताना कार्यकर्त्यांना अधिकारी वर्गाचे सहकार्य आणि त्यांच्याशी समन्वय देखील ते घालून देणार आहेत.रोजगार हमी हा शब्द उच्चारला तरी खड्डे खोदण्याचे चर काढण्याचे अंगमेहनतीचे काम डोळ्यासमोर येते. पण या विभागाच्या विविध प्रकारच्या अडीचशे ते पावणे दोनशे योजना आहेत. त्यात शेत विहिर, शेततळे,

कुक्कुट पालन, शेळी – मेंढी पालन, फळ बाग, फुल बाग, मत्स्योत्पादन या सारख्या योजना आहेतच पण इतर अनेक व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध आहे. त्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचा मनोदय ना. भरतशेठ गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाड विधानसभा मतदार संघात स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर आला होता.अर्थात तो मुद्दा केवळ औद्योगिक वसाहतींपुरता मर्यादित होता. भरतशेठ गोगावले यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर या प्रश्नाला केवळ महाड औद्योगिक वसाहतीपुरतेच नव्हे तर त्यापेक्षाही व्यापक उत्तर शोधण्याचा प्रयत्न ते करित आहेत.आता गरज आहे ती रोजगार , स्वयंरोजगार करण्यास आणि त्यासाठी वाटेल ती मेहनत करण्याची तयारी असलेल्या तरुणांची. आदिवासी समाजाचे प्रबोधन करणेही गरजेचे ठरणार आहे. जर दुसऱ्या बाजुनेही ना. गोगावले यांच्या प्रयत्नांना साथ मिळाली तर रोजगाराची समस्या बऱ्याच अंशी निकाली निघाल्याचे चित्र पहावयास मिळेल.

सरकार आमच्यासाठी काही करत नाही अशी तक्रार सातत्याने केली जात असते. सरकारचाही त्यात दोष असतो. असंख्य सरकारी योजना सामान्य लोकांपर्यंत कधी पोहोचतच नाहीत. त्यामुळे लाभार्थी लाभापासून वंचित राहतात. लाडकी बहिण, लाडका दाजी अशा योजना कायम स्वरूपी नसतात. रोजगार निर्मिती , स्वयंरोजगाराला प्रोत्साहन हे कायम स्वरुपी असते याची जाणीव सरकारनेही ठेवायला हवी.

यु. पी. एस. सी. नागरीशास्त्र मुख्य परीक्षा

मित्रांनो, गेले काही महिने आपण युपीएससी च्या नागरीशास्त्र स्पर्धा परीक्षच्या दृष्टीने चर्चा केली त्यामध्ये पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा, मुलाखत या टप्प्यातून ही परीक्षा घेतली जाते. प्रारंभिय पूर्व परीक्षेचे स्वरूप, प्रश्न संख्या परीक्षेचे माध्यम इत्यादी विषयाची माहिती घेतली. आज आपण पेपर चारचा अभ्यासक्रमाचा सारांश आढावा घेऊया. तत्पूर्वी इथे नमूद करणे गरजेचे आहे कि कदाचित 22 जानेवारी रोजी जाहिरात प्रसिध्द झालेली असेल त्यामध्ये एकूण किती जागासाठी ही परिक्षा घेतली जाणार आहे याचा उल्लेख असेल. पूर्व परिक्षेया दिनांक व इतर तपशीलवार माहिती असेल. त्या बद्दल आपण पुढील आठवड्यात आढावा घेऊ. आज मात्र मुख्य परिक्षेचा पेपर चारचा अभ्यासक्रम व प्रश्नाचे स्वरूप याची माहिती घेऊया.

मुख्य परीक्षेचा पेपर चार (सामान्य अध्ययन) बद्दल पाहूया, मागील लेखात आपण नातिशास्त्र नैसर्गिक क्षमता, ससोटी हे मुद्दे पाहिले. या पेपरच्या अभ्यासक्रमात नातिशास्त्र आणि मानवी संबंध असा अभ्यासक्रमातील मुद्दा पाहिला. या उपघटकावर प्रश्न कशा प्रकारे विचारले गेले होते ते पाहू या.
प्रश्न – सामाजिक आणि मानवी कल्याणामध्ये नीतिशास्त्र कशा प्रकारे योगदान देते हे स्पष्ट करा.
प्रश्न – सध्याच्या इंटरनेटच्या विस्ताराने नव्या प्रकारची सांस्कृतिक मूल्ये रूजवली जी बऱ्याचदा पारंपारिक मूल्यांशी विसंगत असतात चर्चा करा.

प्रश्न- फरक स्पष्ट करा. व्यक्तिगत नैतिकता आणि व्यावसायिक नैतिकता.
प्रश्न – जीवनातील नैतिक वर्तनासंदर्भात तुम्हाला सर्वात जास्त प्रेरित करणारे प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोण आहे? त्याच्या किंवा तिच्या शिकवणीचे सार सांगा. विशिष्ट उदाहरणे देऊन तुम्ही स्वतःच्या नैतिक विकासाकरिता त्या शिवणीचा जीवनात कशाप्रकारे अंगीकार करू शकला आहात ह्याचे वर्णन करा.
अभिवृत्ती व उपघटावर खालील प्रकारे प्रश्न विचारले गेलेत. काही नमूना म्हणून प्रश्न बघुया.
प्रश्न – सार्वजनिक सेवकांद्वारे त्याच्या कामाप्रती नोकरशाहीवादी दृष्टीकोन आणि लोकशाहीवादी दृष्टीकोन असे दोन नेमके दृष्टीकोन दर्शविले जातात, असे दिसून येते.

प्रश्न -सतत अत्यंत तणावाखाली काम करावे लागणाऱ्या नागरी सेवकांच्या बाबतीत सकारात्मक कृती गुण समजला जातो. व्यक्तिमध्ये सकारात्मक कृती कोणत्या घटकांमुळे तयार होते?
नैसर्गिक क्षमता व नागरिसेवा या उपघटकांस खालील प्रमारे प्रश्न विचारले गेलेत.
प्रश्न-प्रशासकीय सेवेच्या संदर्भात खालील बाबीच्या प्रासंगिकतेचे परीक्षण करा.

अ) पारदर्शकता ब) उत्तरदायित्व) क) न्याय व निष्पक्षता, ड)ठाम राहण्याचे धैर्य, इ) सेवेप्रति निष्ठा
प्रश्न- पाच नैतिक गुण कोणते, ज्यांच्या आधारे नागरी सेवकांच्या कामगिरीचे आकलन होऊ शकेल. या गुणांच्या समावेशाचे समर्थन द्या.
वस्तुनिष्ठता – या उपघटकावर प्रश्न असे प्रश्न
प्रश्न – खालील मुद्यावर तीस शब्दात टिप लिहा.
कर्तव्यनिष्ठा – भावनिक बुध्दिमत्ता – या-उपघटकावर खालील प्रमाणे प्रश्न गेलेत.

प्रश्न-द्व्‌ोषाची भावना व्यक्तिचे शहाणपण आणि सदसदविवेक बुद्धी चा घात करणारी असून ती राष्ट्राचे चैतन्य विषारी बनवते. या दृष्टी कोणाशी तुम्ही सहमत आहात का
प्रश्न- यश, चारित्र्य, आनंद आणि चिरकाल टिकणाऱ्या कार्यपूर्ती यासाठी खरोखर महत्वाची गोष्ट म्हणजे भावनिक कौशल्याचा एक निश्चिित संच तुमया ई क्यू केवळ पारंपारिक आय. क्यू चाचण्याव्दारे मोजल्या जाणाऱ्या पूर्णपणे आकलनात्मक क्षमता नाहीत. या मताशी तुम्ही सहमत आहात का? तर्काच्या आधारे तुमच्या उत्तराचे समर्थन करा.

प्रश्न -तुमच्या नैतिक भूमिकेशी तडजोड न करता, सदसदविवेकचा पेच प्रसंग सोडवण्यासाठी भावनिक बुध्दिमत्ता मदत करते का?परीक्षण करा.
भारत व जगातील नैतिक विचारवते-

प्रश्न- एखाद्या देशाला भ्रष्टाचारमुक्त आणि सुंदर विचाराचे राष्ट्र बनवायचे असेल तर मला असे वाटते की तीन प्रमुख सामाजिक सदस्य हे बदल घडवू शकतात ते म्हणजे आई, वडील, आणि शिक्षक एपीजे अब्दुल कलाम, याच्या विधानाचे विश्लेषण करा.
प्रश्न- दुसऱ्याच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून देणे हाच स्वतःला जबण्याचा सर्वोतम मार्ग आहे. महात्मा गांधी

प्रश्न- प्रत्येक कार्यास यशस्वी होण्याआधी शेकडो अडचणींना तोंड द्यावे लागते. जे धीर धरतात त्याना उशिरा का होईना प्रकाश दिसेल – स्वामी विवेकानंद
सार्वजनिक – नागरिक सेवेतील मूल्ये आणि लोक प्रशासनातील नितिशास्त्र प्रश्न पाहूया.
प्रश्न- हितसंबंधात्मक संघर्ष म्हणजे काय? वास्तविक आणि सभाव्य हितसंबंधात्मक संघर्ष यामधील फरक उदाहरणासहित स्पष्ट करा.

प्रश्न – नैतिक दुविद्येचे समाधान करतेवेळी नागरी अधिकाऱ्याकडे आपल्या कार्यक्षेत्राच्या ज्ञानाशिवाय कल्पकता आणि उच्च कोटीची सर्जनशिलता देखील आवश्यक असते. उदाहरणे देऊन 2508 करा.खाजगी जाणि शासकीय संस्थामधील नैतिक व्दिधाआणि चिंता.

प्रश्न – नैतिक द्विधेचे समाधान करते वेळी नागरी अधिकाऱ्याकडे आपल्या कार्यक्षत्राच्या ज्ञानाशिवाय कल्पकता आणि उच्च कोटीची सर्जनशीलता देखील आवश्यक आहे विवेचन करा.
वरील घटक – उपघटकावर काही प्रश्नाचे वनकप कुसे आहे. ते लक्षात यावे म्हणून दिले आहे. पेपर चारच्या विविध घटकांवर प्रश्न पाहू शकता. त्याकरीता बाजारात प्रश्न सचिका उपलब्ध आहे. वरील घटक सोडून कायदे, नियम, नियमन, उत्तरदायित्व, राज्यकारभार, आंतरराष्ट्रीय संबंध, प्रशासनावरील सचोटी नागरी सेवा संकल्पना, कंपन्याचा कारभार माहितीचा अधिकार, आचार संहिता, सेवा, नागरिकाची सनद, सार्वजनिक नीधीचा वापर, भ्रष्टाचार एक आव्हान, शासनामधील माहितीची देवाण घेवाण. इत्या.या सर्व अभ्यासक्रमावर आज पर्यंत विचारले गेलेले प्रश्नांचा अभ्यास करावा, म्हणजे प्रश्नाचे स्वरूप समजून उत्तर कसे असावे ते सुध्दा अभ्यास गरजेचे आहे. चार पेपर मध्ये केस स्टडी या घटकाचा देखील अभ्यास करावा.यापुढे आपण जाहिरात प्रसिद्ध झालेली असेल तर युपीएससी. च्या संकेत स्थळावर भेट द्यावी व वेळ न घालवता फॉर्म भरावा.
अ. रऊफ खतीब
शैक्षणिक समुपदेशक
खेड – रत्नागिरी

दुबई मध्ये आदिबा रखांगेने कोकणचे नाव केले उज्ज्वल एमबीएएस मध्ये 83% गुण मिळवत यशस्वी

दुबई, कोकणातील दुबई स्थित प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक वलिदअब्दुल्ला रखांगे यांच्या कुटुंबातील आदिबा रखांगेने एमबीएएस परीक्षेत 83% गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण कोकणात आनंदाची लाट उसळली आहे.

आदिबाने फक्त एमबीएएसमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली नाही, तर तिने स्पेशल चाइल्ड (विशेष मुलांसाठी) शैक्षणिक प्रकल्पामध्येही महत्त्वाचे योगदान दिले आहे. या प्रकल्पामुळे अनेक पालकांना त्यांच्या मुलांसाठी योग्य शैक्षणिक मार्गदर्शन मिळाले आहे.याशिवाय, आदिबाने युनिव्हर्सिटीतील नेतृत्वक्षमतेचे प्रदर्शन करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. यामुळे तिला ‘बेस्ट स्टुडंट लीडर` हा पुरस्कारही मिळाला आहे. डॉ. आदिबा रखांगेने आपल्या भविष्यासाठी ठरवलेल्या उद्दिष्टांसाठी काम करताना विविध कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवले आहे. तिच्या या यशामुळे कोकणातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान बनली आहे. डॉ. अदिबाचे काका व राजकिय व समाजिक क्षेत्रात नवाजलेली व्यक्ति खालिद रखांगे, साजिद रखांगे, शाहिद रखांगे, मुनाफ वाडकर व इतर नातेवाईक यांनी आनंद व्यक्त केला व शुभेच्छा दिल्या.

Timely Compensation in Land Acquisition: A Victory for Justice

Delays in land acquisition compensation have long undermined the rights of landowners in India. In a landmark decision, the Supreme Court has taken a bold stand, ruling that in cases of excessive delays, compensation must reflect the current market value rather than the value at the time of the acquisition notification. This judgment, delivered in the case of Bernard Francis Joseph Vaz and Ors v. Government of Karnataka and Ors, highlights the judiciary’s commitment to fairness and justice.

The case revolved around landowners whose property was acquired for public infrastructure projects. Despite the acquisition, they had to endure years of waiting without compensation. Recognizing this injustice, the Supreme Court held that delays in payment warranted a re-evaluation of compensation based on the current market value, ensuring the landowners were not shortchanged by outdated valuations.

This decision sets a critical precedent, emphasizing that development must not come at the cost of individual rights. It sends a clear message to authorities: administrative inefficiencies cannot be an excuse to deprive citizens of fair treatment.

This ruling has far-reaching consequences:

  1. Strengthening Property Rights: By reinforcing Article 300-A of the Constitution, the Court safeguards citizens’ rights to just compensation for their land.
  2. Promoting Accountability: Government agencies are now under greater pressure to ensure timely disbursal of compensation.
  3. Balancing Development with Justice: The judgment underscores that progress must align with fairness, ensuring individuals are not left disadvantaged by the system.

The Way Forward

This landmark decision is a reminder of the judiciary’s critical role in upholding justice. While land acquisition is vital for infrastructure and development, this ruling ensures that individuals do not bear undue hardship due to bureaucratic delays. It calls for a systemic overhaul to ensure that timely and fair compensation becomes the norm, not the exception.

As India moves forward with ambitious development projects, the balance between public interest and individual rights must remain at the forefront. The Supreme Court’s decision serves as a guiding light, showing that fairness and justice can coexist with progress.

Dr. Danish Lambe is a journalist and political analyst with an M.A. in Political Science, specializing in governance and public policy. He writes extensively on issues of justice, equity, and constitutional rights.

इतिहासाचे सत्य आणि विकृतीकरणाचा संघर्ष

एक बोधकथा आहे. अनेकांनी ती शालेय पुस्तकात वाचली देखील असेल. चार आंधळे एका हत्तीजवळ जातात आणि स्पर्शाने तो हत्ती अनुभवतात. ज्याच्या हाताला शेपटी लागते तो सांगतो हत्ती सापासारखा आहे. जो हत्तीच्या पायाला स्पर्श करतो तो सांगतो हत्ती खांबासारखा आहे. ज्याच्या हाताला कान लागतो तो सांगतो हत्ती सुपासारखा आहे तर ज्याच्या हाताला सोंड लागते तो सांगतो हत्ती हातासारखा आहे. ते आंधळे होते. त्यांना हत्तीची जी अनुभूती मिळाली ती त्यांनी वर्णन तरी केली.

पण आज आपण डोळे असून आंधळे , डोके असून अज्ञानी झालो आहोत. त्याचे काय करायचे हा मोठा प्रश्न आहे.डोळे असून आंधळे आणि डोके असून बिनडोक असण्यामुळे वास्तव आणि विकृती यातील फरक आपल्याला कळेनासा झाला आहे. आपल्यातील याच दोषामुळे विकृत इतिहास लिहिला गेला आणि तोच खरा इतिहास म्हणून आपण डेक्यावर घेवून नाचलो. जेव्हा आधुनिक इतिहासकारांनी ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार घेवून सत्य इतिहास जगासमोर मांडला तेव्हा त्यांच्या सत्यकथनावर आपण सहजासहजी विश्वास ठेवला नाही. दुर्दैवाने काही लोक आणखी एक विशिष्ट चष्मा डोळ्यासमोर ठेवून ईतिहासाचे विकृतीकरण करण्यात स्वतःला धन्य समजतात आणि आपण सांगतो तोच इतिहास खरा असा विचार समाजावर लादण्याचा प्रयत्न करत त्यावेळेस त्यांना दुर्लक्षित करण्याऐवजी विशिष्ट समाज घटक त्याची री ओढायला सुरुवात करतात त्यावेळेस समाजाने सारासार विचार करण्याची शक्ती गमावली आहे, याचे प्रत्यंतर आल्या खेरीज राहात नाही.महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. विद्येविना मती गेली।

मतिविना निती गेली। नितिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले । असे सांगत त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. पुण्यातल्या भिडे वाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्यांच्या या स्त्री शिक्षणाच्या यज्ञात त्यांना तोलामोलाची साथ दिली त्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी. त्या पहिल्या शिक्षिका ठरल्या. सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या फातिमा शेख. फातिमा शेख यांचे नाव आणि आडनाव जर वेगळ्या धर्माचे असते तर आज सावित्रीबाई फुले यांच्या इतकाच त्यांनाही मानसन्मान मिळाला असता. पण केवळ त्यांचे नाव फातिमा शेख आहे म्हणून त्यांचे अस्तित्वच नाकारण्याचा करंटेपणा एका तथाकथित संशोधकाने दाखविला आहे आणि त्याचे समर्थन करण्यासाठी अनेक बेगडी विचारवंत मैदानात उतरले आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले किंवा त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांचा इतिहास काही हजार पाचशे वर्षांपूर्वीचा नाही की त्या काळातील उपलब्ध दस्तावेजांचा अर्थ लावता येणार नाही. इनमीन दीड दोनशे वर्षापूर्वीचा तो इतिहास आहे आणि त्याचे दस्तावेज तत्कालीन प्रचलीत मराठीत आणि इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहे. जेम्स लेन नामक पाश्चात्य इतिहासकाराने उपलब्ध दस्तावेजातील संदर्भांचा अर्थाचा अनर्थ लावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे विकृतीकरण केले. प्रचंड क्षोभ उसळला. त्याची पुस्तके जाळली गेली. त्याला ऐतिहासिक दस्तावेत उपलब्ध करून देणाऱ्या पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राची तोडफोड करण्यात आली. त्यावेळेस राज्याचे गृहमंत्री होते स्व. आर. आर. पाटील त्यांनी एका वाक्यात सांगितले होते, शिव चरित्राचे विकृती करणारांना एकच उत्तर दिले जायला हवे ते म्हणजे कानाखाली आवाज.कोण्या दिलीप मंडल नामक अशाच इतिहासाची विकृती करण्यात धन्यता मानणाऱ्याने फातिमा शेख नावाची व्यक्तीच नव्हती असा जो दावा केला आहे तो दावा खरा तर दुर्लक्ष करण्याच्या लायकीचाच आहे. पण इतिहास पुरुषांचे नाव घेवून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे धंदे करणारे समाज माध्यमांवरील जे त्याचे समर्थन करित जे थैमान घालू लागले आहेत ते चिंताजनक म्हणावे लागेल. विकृत तर्क लावून इतिहासाचे विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न आजही सुरु आहे. दिलीप मंडल हे त्याचे उदाहरण. अशा परिस्थितीत समाजाने एकत्रितपणे जागरूक राहून ऐतिहासिक सत्याचा प्रचार आणि विकृतीकरणाला प्रतिकार करणे अधिक महत्त्वाचे आहे.

तुमचे प्रश्न, माझी उत्तरे

निरोगी जीवनशैली (नवीन स्तंभ)
दवात्याग

स्पष्टीकरण ः हा लेख केवळ शैक्षणिक व माहिती देणारा उद्देश ठेवून तयार केला आहे.कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. या लेखातील माहिती व्यक्तिगत वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. तुमच्या आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नेहमी तज्ञ वैद्यकीय सल्लागाराशी संपर्क करा.
माझ्या स्तंभाची प्रस्तावना:
ज्यांना माझ्याबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी, माझं नाव शकूर तिसेकर. मी खेड तालुक्यातील तिसे गावचा रहिवासी आहे. मी मल्टिनॅशनल कंपनीतून निवृत्त वरिष्ठ आयटी अभियंता असून सध्या मेलबर्न, ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहे. मी दोन पुस्तके लिहिली आहेत: उर्दूमध्ये नकुशे मंझिलआणि इंग्रजी मध्ये द डाएट मिस्ट्रीज.
माझ्या कार्याला व्यापक मान्यता मिळाली आहे.द डाएट मिस्ट्रीज या पुस्तकासाठी मलालिटरेसी पायोनियरच्याहॉल ऑफ फेम 2023 पुरस्काराने गौरविण्यात आले, ज्याचा उल्लेखझी न्यूजच्या (हिंदी आवृत्ती) बातमीत केला गेला. याशिवाय, या पुस्तकालादिल्ली वायरच्यामहिन्याच्या टॉप टेन पुस्तकांमध्येस्थान मिळाले आणिमिड डेवडेक्कन हेराल्डया इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये देखील प्रशंसा झाली.
तुम्हाला वाटेल, मी माझ्या या यशांचा उल्लेख का करतोय? याचे खरे श्रेय कोकण की आवाज या गटाला जाते, ज्यांनी मला आणि आमच्या समाजातील अनेक लोकांना आपले लेख प्रकाशित करण्याची आणि लेखक म्हणून प्रगती करण्याची संधी दिली. या गटामुळेच अनेक कोकणी लेखक उच्च शिखरांपर्यंत पोहोचले आहेत, ज्यांनाउर्दू साहित्य अकादमी पुरस्कारसारखे सन्मानही मिळाले आहेत. आमच्या साहित्यिक प्रवासाला बळ दिल्याबद्दलकोकण की आवाजगटाबद्दल माझ्या अंतःकरणातून कृतज्ञता व्यक्त करतो.
माझे पुस्तक “द डाएट मिस्टरीज” प्रकाशित झाल्यानंतर मला आहार आणि पोषण याबाबत असंख्य प्रश्न विचारले गेले. काही लोकांनी वैयक्तिक भेटीत हे प्रश्न विचारले, तर काहींनी व्हॉट्सॲप आणि ईमेलद्वारे माझ्याशी संपर्क साधला. या विषयावरील प्रचंड उत्सुकतेला उत्तर देण्यासाठी, मी 26 ऑक्टोबर 2024 रोजी इस्लाम जिमखाना येथे प्रश्नोत्तर सत्र आयोजित केले, जिथे अनेक विचारप्रवर्तक प्रश्न समोर आले.
वाचकांसोबत अधिक चांगला संवाद साधण्याची गरज ओळखून, मी या सर्व प्रश्नांचे संकलन करण्याचा निर्णय घेतला. वाचकांना काय जाणून घ्यायचे असेल याचा अंदाज लावून आणि कदाचित प्रतिसाद न मिळणारे लेख लिहिण्याऐवजी, मला वाटले की तुम्ही विचारलेल्या वास्तविक प्रश्नांना उत्तरे देणे अधिक चांगले आहे. या दृष्टिकोनामुळे लेख अधिक संवादात्मक आणि सुसंगत होतात आणि एकतर्फी भाषणाऐवजी द्विपक्षीय संवाद साधता येतो.
जीवनशैली विषयांवरील ज्ञान सामायिक करण्यासाठी व्यापक पोहोच मिळवण्याच्या माझ्या प्रयत्नात – ज्यात आहार, पोषण, व्यायाम, ताण व्यवस्थापन, झोप आणि अधिक काहीसमाविष्ट आहे – मी संपादक दिलदार पूरकर यांच्याशी “रायगड चा आवाज“ मध्ये नियमित स्तंभ लिहिण्याचा प्रस्ताव दिला. दिलदार पूरकरांशी याविषयी चर्चा केली असता, त्यांनी या कल्पनेचे स्वागत केले आणि अशा विषयांवरील लेख क्वचितच प्रकाशित होतात, असे सांगितले. त्यांनी माझ्या लेखांसाठी त्यांचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
नेहमीप्रमाणे, हा स्तंभ संवादात्मक, आणि तुम्हाला उपयोगीठरेल याची मी काळजी घेईन. आजचा विषय एका विचारलेल्या प्रश्नावर आधारित आहे: “स्त्री, पुरुष, लहान मुले, प्रौढ, आणि वृद्ध व्यक्ती यांच्यामध्ये पोषणाची गरज कशी वेगळी असते?
या प्रश्नाचे सर्वसमावेशक उत्तर देण्यासाठी, मी हा विषय दोन भागांमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा चर्चेचा भाग प्रामुख्याने वृद्ध पुरुषांच्या पोषण गरजांवर केंद्रित असेल. विषय मर्यादित करून, वृद्ध पुरुषांसाठी पोषण गरजा कशा बदलतात आणि का, याबाबत सखोल माहिती मिळवता येईल.
दुसऱ्या भागात, प्रौढ आणि वृद्ध स्त्रिया, गरोदर स्त्रिया, तसेच लहान मुलांच्या पोषण गरजांवर चर्चा केली जाईल.
चला तर, आजच्या चर्चेला सुरुवात करूया आणि वृद्ध पुरुषांसाठी पोषण गरजा त्यांच्या तरुण वयातील गरजांपेक्षा कशा वेगळ्या असतात, हे समजून घेऊया.
प्रौढ आणि वृद्ध पुरुषांसाठी पोषण आवश्यकतांचा तक्ता:
पोषकतत्त्व प्रौढ पुरुष (19-50 वर्षे) वृद्ध पुरुष (51+ वर्षे)
व्हिटॅमिन A 900 mcg RAE 900 mcg RAE
व्हिटॅमिन C 90 mg 90 mg
व्हिटॅमिन D 600 IU (15 mcg) 600-800 IU (15-20 mcg)
व्हिटॅमिन E 15 mg 15 mg
व्हिटॅमिन K 120 mcg 120 mcg
थायमिन (B1) 1.2 mg 1.2 mg
रायबोफ्लेविन(B2) 1.3 mg 1.3 mg
नायसिन (B3) 16 mg 16 mg
व्हिटॅमिन B6 1.3 mg 1.7 mg
फोलेट (B9) 400 mcg 400 mcg
व्हिटॅमिन B12 2.4 mcg 2.4 mcg
पँटोथेनिक ऍसिड (B5) 5 mg 5 mg
बायोटिन (B7) 30 mcg 30 mcg
कॅल्शियम 1000 mg 1000 mg
आयरन 8 mg 8 mg
जस्त (झिंक) 11 mg 11 mg
तांबे (कॉपर) 900 mcg 900 mcg
सेलेनियम 55 mcg 55 mcg
मॅग्नेशियम 400-420 mg 420 mg
मॅग्नेशियम 400-420 mg 420 mg
प्रौढ आणि वयस्क पुरुषांमधील महत्त्वाचे पोषण फरक:
जीवनसत्त्व डी
• प्रौढ पुरुष: 600 IU (15 mcg)
• वयस्क पुरुष: 600-800 IU (15-20 mcg)
• का? वयानुसार, त्वचेची जीवनसत्त्व डी संश्लेषित करण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चर सारख्या हाड समस्यांचा धोका वाढतो. हाडांची घनता आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी वयस्क पुरुषांना जास्त सेवनाचा फायदा होतो.
जीवनसत्त्व बी-6
• प्रौढ पुरुष: 1.3 mg
• वयस्क पुरुष: 1.7 mg
• का?वयस्क पुरुषांना योग्य मेंदू कार्यासाठी आणि बोधात्मक ऱ्हासाच्या धोक्याशी लढण्यासाठी अधिक जीवनसत्त्व बी-6 ची आवश्यकता असते. तसेच, व्यक्तिगत घटक आणि आरोग्य परिस्थितींवर आधारित जीवनसत्त्व बी-6 च्या गरजा बदलू शकतात. उदाहरणार्थ, फेनिलकेटोनुरिया (PKU – एक अनुवांशिक विकार) असलेल्या रुग्णांना जीवनसत्त्व बी6 च्या पूरकांची आवश्यकता असू शकते.
मुख्य प्रवाहातील विज्ञान विरुद्ध वादग्रस्त मुद्दे:
स्वीकृत सर्वसंमती:
कोष्टकात सादर केलेल्या आहार संदर्भ मूल्ये खालील मुख्य प्रवाहातील संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत आहेत:
• राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH)
• जागतिक आरोग्य संघटना (WHO)
• औषध संस्था (IOM)
या संस्था वयस्क पुरुषांसाठी जीवनसत्त्व डी, बी-6 आणि कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या वाढीव गरजेबद्दल बहुतांश सहमत आहेत.
वादग्रस्त मुद्दे

  1. जीवनसत्त्व डी मात्रा:
    o असहमती:काही शास्त्रज्ञांनी उच्च डोसच्या सार्वत्रिक सप्लिमेंटेशनला विरोध केला आहे, कारण त्यांना असे वाटते की हे सर्वांसाठी अतिरिक्त फायदे प्रदान करत नाही.
    o कारण: हृदयरोग किंवा कर्करोग यासारख्या दीर्घकालीन आजारांवर जीवनसत्त्व डी च्या प्रभावाबद्दल अभ्यासांनी मिश्र परिणाम दर्शवले आहेत.
  2. कॅल्शियम अतिरेक:
    o टीका: पूरकांमधून अतिरिक्त कॅल्शियम सेवन, विशेषत: जेव्हा मॅग्नेशियम किंवा जीवनसत्त्व के-2 सोबत न घेतल्यास, धमनी कॅल्सिफिकेशनशी संबंधित आहे.
    o सल्ला: गोळ्यांऐवजी दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या आणि कडधान्ये यासारख्या आहारातील स्रोतांची तज्ज्ञ शिफारस करतात.
  3. मॅग्नेशियम कमतरतेची जागरूकता
    o आव्हान: वयस्क प्रौढांसाठी महत्त्वाचे असूनही आहार मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मॅग्नेशियमकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. हिमायती गट या कमी महत्त्व दिलेल्या खनिजावर अधिक भर देण्याची मागणी करतात.
  4. जीवनसत्त्व बी-6 :
    वादग्रस्त मुद्दा: जीवनसत्त्व बी-6 च्या उच्च मात्रेच्या पूरकांचा संबंध मज्जातंतूंच्या नुकसानीशी जोडला गेला आहे. टीकाकार 1.7 mg बी-6 ची वाढलेली आवश्यकता प्रामुख्याने कोंबडी, केळी आणि समृद्ध केलेले धान्य यासारख्या अन्न स्रोतांमधून मिळवण्याची शिफारस करतात.
    निष्कर्ष:
    वयस्क पुरुषांनी पोषक तत्वांच्या शोषण आणि चयापचयातील बदलांना सामावून घेण्यासाठी त्यांच्या आहारात बदल करणे आवश्यक आहे. हे कोष्टक व्यापकपणे स्वीकृत शिफारसी दर्शवत असले तरी, जीवनसत्त्व डी आणि कॅल्शियमच्या इष्टतम सेवनावरील चर्चा वैयक्तिकृत दृष्टिकोनाची गरज अधोरेखित करतात. आहारात महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी नेहमी आरोग्य सेवा प्रदाता किंवा आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्या!
    कृपया तुमचे प्रश्न shakur.tisekar@gmail.com वर पाठवण्यास विसरू नका. तुम्ही विशेषतः अन्यथा विनंती केली नाहीत, तर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देताना तुमचे नाव लेखात समाविष्ट करेन. चला या स्तंभाला निरोगी जीवनाकडे जाणाऱ्या जीवंत आणि अंतर्दृष्टीपूर्ण प्रवासात रूपांतरित करूया.
    शकूर तिसेकर,
    (मेलबर्न, ऑस्ट्रेलिया)

ڈیڈ کنوینس اور ڈیمیڈ کنوینس: حقوق کی بازیابی کا درخشاں راستہڈاکٹر دانش لانبے

ہمارے شہروں کی ہاؤسنگ سوسائٹیز محض اینٹ اور پتھر کے ڈھیر نہیں، بلکہ ان میں بستی ہیں امیدیں، خواب، اور آنے والی نسلوں کے لیے محفوظ مستقبل کا تصور۔ مالکانہ حقوق کی جنگ دراصل محض ایک کاغذی کارروائی نہیں، بلکہ اپنی زمین، اپنے گھر اور اپنی آزادی کی لڑائی ہے۔ ایسے میں دو راستے سامنے آتے ہیں: ایک ڈیڈ کنوینس، جس میں بلڈر کے تعاون سے آسانی سے حقوق مل جاتے ہیں، اور دوسرا ڈیمیڈ کنوینس، جو ہمت، صبر اور مستقل مزاجی کی آزمائش ہے لیکن بالآخر کامیابی کے راستے کھول دیتا ہے۔

ڈیڈ کنوینس ایک سہل راہ ہے، بشرطیکہ بلڈر مہربان ہو اور قانونی تقاضے باہمی رضامندی سے پورے ہو جائیں۔ اس سے سوسائٹی کو یک گونہ سکون ملتا ہے اور ہر فرد کے دل میں اطمینان کی ایک خوشگوار لہر دوڑ جاتی ہے۔ مگر یہ دنیا ہمیشہ مہربان نہیں، بعض اوقات بلڈر ہچکچاتا ہے، تاخیر سے کام لیتا ہے، یا سیدھی طرح انکار کر دیتا ہے۔ یہی وہ لمحہ ہے جب ڈیمیڈ کنوینس کا قانونی ہتھیار میدان میں آتا ہے۔ یہ وہ سفر ہے جس میں آپ کو بار بار دفاتر کے چکر لگانے پڑتے ہیں، دستاویزات کا ڈھیر اکٹھا کرنا ہوتا ہے، اور حکام کے سامنے دلیلوں کی شمع روشن کرنا پڑتی ہے۔ مگر اس محنت کا پھل ایک دن ضرور ملتا ہے، جب حکام سوسائٹی کے حق میں حکم نامہ جاری کرتے ہیں، اور مالکانہ حقوق سوسائٹی کے نام لکھے جاتے ہیں۔

ڈیمیڈ کنوینس کے فوائد صرف قانونی تحفظ تک محدود نہیں۔ جب سوسائٹی کے حقوق واضح ہو جائیں تو دوبارہ تعمیر کے منصوبے، مرمت کے کام، اور ترقیاتی سوچ آگے بڑھتی ہے۔ انویسٹمنٹ یا قرض ملنا بھی آسان ہو جاتا ہے، پراپرٹی کی مارکیٹ ویلیو بڑھتی ہے، اور یوں پورا محلہ اقتصادی و سماجی استحکام کی راہوں پر گامزن ہوتا ہے۔ یہ صرف ایک قانونی دستاویز نہیں، بلکہ آنے والی نسلوں کے لیے مضبوط بنیاد ہے جو آپ کو خودمختاری اور اختیار بخشتی ہے۔

مگر یاد رکھیں، یہ راستہ سادہ نہیں۔ ڈیمیڈ کنوینس کے عمل میں وقت اور سرمائے کا صرفہ ہوتا ہے، قانونی موشگافیوں کے پیچیدہ راستوں پر چلنا پڑتا ہے، اور کبھی کبھار عدالتی دروازوں پر بھی دستک دینی پڑتی ہے۔ ایسے میں نیم حکیم قسم کے مفت مشورہ دینے والوں سے بچنا ضروری ہے۔ ان کے الفاظ میں وقتی سستی ہوسکتی ہے، مگر بعد میں یہ مشورے آپ کو مزید پریشانی اور نقصان کی گہرائی میں دھکیل سکتے ہیں۔ ہمیشہ تجربہ کار اور قابلِ اعتماد ماہرین سے رہنمائی حاصل کریں، جو نہ صرف قانون کی باریکیوں کو سمجھتے ہوں بلکہ آپ کے مفاد کو مقدم رکھتے ہوں۔

یہ بات بھی اہم ہے کہ اس جدوجہد میں کئی سوسائٹیز کامیاب ہوئی ہیں۔ ممبئی، پونے اور دیگر شہروں میں ڈیمیڈ کنوینس کے ذریعے بے شمار رہائشیوں کو یقین ہو گیا کہ وہ اپنے گھروں کے اصلی مالک ہیں، کسی بلڈر کے رحم و کرم پر نہیں۔ یہ کامیاب مثالیں اس بات کا ثبوت ہیں کہ صبر، ہمت، اور مضبوط قانونی حکمتِ عملی سے آپ اپنے حقوق حاصل کر سکتے ہیں۔

یاد رکھیں، یہ صرف ایک قانونی جنگ نہیں بلکہ عزت، آزادی، اور بہتر کل کی لڑائی ہے۔ اگر آپ ڈیڈ کنوینس یا ڈیمیڈ کنوینس کے پیچیدہ راستوں پر چلنا چاہتے ہیں، اپنے حقوق کا تحفظ چاہتے ہیں، تو ہمیشہ قابل اعتماد ماہرین سے مدد لیں۔ غلط مشوروں کے اندھے کنویں میں چھلانگ لگانے سے بہتر ہے کہ آپ ایمان دار اور تجربہ کار پیشہ ور افراد کی رہنمائی میں یہ سفر طے کریں۔

اگر اس معاملے میں آپ کو کسی ماہر قانونی مشورے کی ضرورت ہے تو بلا جھجھک ہم سے رابطہ کریں۔ ہم آپ کے ساتھ کھڑے ہیں، تاکہ آپ اپنے حقوق کی بازیابی کا یہ درخشاں سفر کامیابی سے مکمل کرسکیں۔

دُكھیا

عورت شجر انسانیت میں برگ و بار پیدا کرنے کی موجب اور نسل انسانی کو زندہ رکھنے اور آگے بڑھانے کا ذریعہ ہے۔ یہ کسی عظیم دانشور کے قول کے مصداق ان اشجار انسانی کی خاطر خواہ پرورش اور نشوونما، تنومندی، تعلیم و تربیت، آداب و اخلاق کا درس دینا والدین کا اولین فرض بنتا ہے تاکہ وہ اپنی آنے والی زندگی خوشگوار گزار سکیں۔ زندگی کا یہ معاملہ Kids Having Born Kids کا سلسلہ تا ابد چلنے والا ہے۔

اگر مرد اور عورت کے فرائض پر نظر ڈالیں تو عورت بظاہر دُكھیا نظر آئے گی۔ یہ باوفا، پیکر خلوص، ہمدردی اور وفاشعاری کے ہوتے ہوئے ڈانٹ ڈپٹ اس کا مقدر سا بن جاتا ہے۔ بیٹی کے روپ میں اسے صبح شام گھر بار کی صفائی، ہنڈی برتن مانجھنے، کپڑے دھونے، سب کو کھانا کھلا کر بستر لگانے اور گھر کے ہر فرد کی ضرورت کا خیال رکھنے وغیرہ سے فرصت نہیں ملتی۔ شادی کے بعد جب ماں بن جاتی ہے تو اور جھمیلے بڑھ جاتے ہیں۔ جن میں قانون فطرت کے مطابق ماں کے طور پر بچے کو تکلیف کے ساتھ پیٹ میں رکھنا، بڑی تکلیف کے ساتھ جنم دینا اور مہینوں شیرو صالح خون (دودھ پلانا)، صاف صفائی کرنا لازمی ہوتا ہے۔ کچھ شوہر نامدار ساتھ ہوتے ہوئے بھی اپنی شریک حیات کا ہاتھ بٹانے اور ان سہاگ کے پھولوں کی صفائی اور دیکھ بھال کرنا اپنی شان کے خلاف سمجھتے ہیں، حالانکہ خود کی صفائی کرنے میں کوئی قباحت نہیں ہوتی۔

دراصل، اسے روایتی شان اور مردانہ برتری کہنا غلط نہ ہوگا، حالانکہ قرآن و سنت کی روشنی میں عورتوں کو بھی معروف طریقے پر ویسے ہی حقوق حاصل ہیں جیسے مردوں کے حقوق عورتوں پر ہیں۔ آپؐ کا پھٹے پرانے کپڑے ٹانکنا، کپڑے دھونا اور دیگر کاموں میں ہاتھ بٹانے کے بیشتر شواہد ملتے ہیں۔ “اور تم میں سے بہتر وہ ہے جو اپنی عورتوں کے لئے سب سے اچھا ہے”۔

بعض اوقات چھوٹی چھوٹی باتیں بڑی غلط فہمیوں کا سبب بن جاتی ہیں۔ حالانکہ شادی کے بعد بیٹیاں اپنے ماں باپ، بھائی بہن کو چھوڑ کر بڑے ارمانوں اور سنہرے خواب سجائے سسرال داخل ہوتے ہی اس نئے، اجنبی اور پرائے لوگوں سے اٹوٹ رشتہ استوار کرکے ساس، سسر، دیور، نند کو بالترتیب ممی، امی جان، ابا، ابو، بھائی جان، آپی، بہن جان وغیرہ حقیقی ماں باپ اور بھائی بہن کا درجہ دے کر نوازتی ہیں اور ان کی حتی الامکان خدمات بجا لانے سے نہیں تھکتی۔ مگر قسمت آوری کہ معمولی رنجش اور غلط فہمی سے سارے ارمانوں پر پانی پھرنے میں دیر نہیں لگتی۔ چنانچہ اس آپس کی بے رخی، دوری، دل آزاری اور گھٹن میں شجر انسانی سے جنم لینے والے بچے کا نفسیاتی طور پر نحیف، ذہنی کمزور، ڈرپوک وغیرہ پیدا ہونا بنیادی اسباب ہوتے ہیں۔

غالباً اس کا دوسرا اور اہم پہلو خلاف توقع لڑکی والوں سے معیاری صوفہ سیٹ، کنگ سائز دیوان بیڈ، گوڈریج الماری، جدید قسم کا فارمیکا ٹیبل مع کشن، کرسیاں، نان اسٹک کوکنگ برتن، کروکری (کانچ کے برتن) وغیرہ کی کمی بیشی ہوسکتی ہے۔ خدانخواستہ نئی اور جدید قسم کی موٹر کار، موٹر بائیک وغیرہ کا مطالبہ کرتے نہ پھریں، جس کے ردعمل میں غریب اور اوسط گھروں کی مجبور لڑکیاں زندگی بھر ازدواجی زندگی کے لئے ترستی اور سسکتی نہ رہیں۔ چونکہ اس کا تریاق ہفتہ روزہ کوکن کی آواز کی اجتماعی شادیوں کے تحت قابل صد ستائش ہے۔ اس کا دائرہ عمل تحصیل کے چھوٹے بڑے شہروں تک پھیلانے سے اور بھی فروغ حاصل ہوگا۔

روایتی، سماجی اور فردی قسم کے رسم و رواج میں لڑکیوں کا فلانا شعبہ میں اعلیٰ تعلیم لینا، پولیس اور دیگر کریئر اپنانا معیوب گرداننا، بولنے، چلنے، پھرنے، لباس کے رکھ رکھاؤ اور بال وغیرہ سنوارنے پر پابندیاں، یہ وہ نہ کرنے پر حلال و حرام کی قید بچیوں میں احساس کمتری، دل آزاری اور بہت حد تک خود اعتمادی کو بھی مجروح کردیتی ہے۔ البتہ اچھے طریقے سے رہنا، عزت و عفت کی زندگی بسر کرنا، یہ ہدایات کرنا کارآمد اور حوصلہ مندانہ ہوتی ہیں۔

چونکہ بدلتے ہوئے حالات میں لڑکے ہوں یا لڑکیاں انہیں اعلیٰ تعلیم یافتہ بنانا وقت کا تقاضا ہے تاکہ وہ آنے والی زندگی میں خود کفیل رہیں۔ ممکن ہے حالیہ عرب اسرائیل دوستی سے گلف میں کافی تبدیلیاں رونما ہوسکتی ہیں۔ جن میں خدانخواستہ ہمارے زیر ملازمت بھائیوں پر کوئی برا اثر نہ پڑے۔ جس کی خاطر ہمارے کئی کوکنی مسلم بھائی اپنی قسمت آزمائی میں مقامی سرکاری اور نیم سرکاری نوکریاں مع فنڈس اور پینشن کوارٹرس وغیرہ اسکیموں کو چھوڑ کر گلف کا رخ کرچکے تھے۔ لہٰذا وہ گزشتہ چار تا پانچ دہائیوں میں کہاں تک کامیاب ہوئے ہیں، اس سے ہر کوئی واقف ہوگا۔

مزید تفصیلات کے لئے مضمون کو جاری رکھیں۔

ڈاکٹر من موہن سنگھ

اردو ادب کے عاشق

اس ملک کی آزادی کے بعد اب تک جتنے وزیر اعظم گذرے ہیں، ان میں من موہن سنگھ کا نام سب سے نمایاں ہے۔ لوگوں میں سب سے زیادہ مقبول اور سب کے محبوب یہی وزیر اعظم ہیں۔ ایک طرف ان کے اپنے ثنا خواں ہیں، تو دوسری طرف ان کے مخالفین بھی ان کے کارناموں اور اوصاف کے گیت گا رہے ہیں۔ ان اوصاف میں اردو ادب سے دلچسپی اور اردو سے محبت ان کی زندگی کا ایک درخشاں باب ہے۔ “زبان خلق کو نقارہ خدا سمجھو” کے مصداق ڈاکٹر من موہن سنگھ کی زندگی کے نقوش نہ صرف لوگوں کی زبان زد ہیں بلکہ دلوں پر بھی ثبت ہیں۔

واقعتاً ڈاکٹر من موہن سنگھ ایسے ہی تھے کہ اگر ان کی زندگی کا گہرائی سے نہیں بلکہ سرسری بھی مطالعہ کیا جائے، تو یہ بات بہت جلد واضح ہو جائے گی کہ ڈاکٹر من موہن سنگھ ایک تاریخ ساز شخصیت تھے، بہت سی خوبیوں کے مالک تھے، اقتصادیات اور معاشیات کے ماہر تھے۔ پوری دنیا جب معاشی اعتبار سے بھنور میں پھنسی ہوئی تھی، تو ہندوستان کی معاشی کشتی کو غرقاب ہونے سے بچانے والے یہی من موہن سنگھ تھے۔ ان کے ان کارناموں کے چرچے ان کی زندگی میں بھی خوب ہوئے لیکن ان کے انتقال کے بعد سب سے زیادہ چرچا اسی کامیابی کا ہے۔

ڈاکٹر من موہن سنگھ کی شخصیت کا ایک نمایاں پہلو ان کی اردو زبان اور ادب سے گہری محبت تھی۔ وہ اردو کو صرف ایک زبان نہیں بلکہ ہندوستان کے ثقافتی ورثے کا ایک اہم جزو سمجھتے تھے۔ اپنے دور حکومت میں انہوں نے اردو کی بقاء اور ترویج کے لئے بہت اقدامات کئے۔ انہوں نے غالب، اقبال، اور میر کے اشعار کو اپنی تقاریر میں استعمال کرکے یہ ثابت کیا کہ ادب اور سیاست ایک دوسرے سے جدا نہیں ہیں بلکہ ایک دوسرے کے معاون ہو سکتے ہیں۔ ان کی تقاریر کو اکثر اردو رسم الخط میں تیار کیا جاتا تھا، جو اردو زبان کی اہمیت پر ان کے یقین کی علامت تھی۔

اسی طرح وزیر اقلیت اور سچر کمیٹی کے قیام کا سہرا بھی انہی کے سر سجتا ہے۔ بظاہر ایک خاموش رہنے والے شخص نے جب اس ملک کی باگ دوڑ سنبھالی اور ملک کے خزانے پر نگران اور وزیر متعین ہوئے، تو انہوں نے شفافیت کے ساتھ ملک کے مقدر میں ترقی کی ایسی لکیر کھینچی جسے زمانہ یاد رکھے گا۔

نیز انہوں نے اس عظیم منصب کا استعمال جس انداز سے ملک کی ترقی کے لئے کیا، وہ موجودہ اور مستقبل میں اس منصب پر براجمان ہونے والے افراد کے لئے مشعل راہ ہے۔ ضرورت اس بات کی ہے کہ اہل سیاست کو ڈاکٹر من موہن سنگھ کی نہ صرف سیاسی بلکہ غیر سیاسی زندگی سے بھی سبق لینا چاہیے تاکہ ڈاکٹر من موہن سنگھ کی طرح ہر سیاسی لیڈر “ڈھونڈو گے مجھے میرے بعد” کے مصداق بن سکے اور ملک کی ترقی میں اپنا نام شامل کر سکے۔