awazadmin

कवयित्री सायराबानू वजीर चौगूले

“एक शिक्षिका, कवयित्री, आणि समाजसेविका – जिथे शब्द आणि ज्ञानाचा संगम जीवन समृद्ध करतो.”

जन्म तारीख – 22/12/1972

शिक्षण – B A Ded

पद – शिक्षिका

पत्ता –
आशियाना अपार्ट., कचेरी रोड
ब्लॉक न.१०२, बी विंग
कचेरी रोड माणगाव
मु. पो. ता. माणगाव जि. रायगड
पिनकोड ४०२१०४

मोबाईल नंबर – 8484932146

आवड/छंद – खेळ, वाचन, काव्यलेखन, वैचारिक लेखन


शैक्षणिक कार्य —

  • तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शनात विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करून विशेष सहभाग नोंदवला आहे.
  • सावित्रीबाई दत्तक पालक योजनेंतर्गत स्वतः मागासवर्गीय मुलींना दत्तक घेऊन शैक्षणिक साहित्याची मदत केली आहे.
  • वृक्षसंवर्धन व संगोपनासाठी वृक्षदिंडी व वृक्षारोपणासारखे कार्यक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.
  • शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नवोपक्रम व कृतीसंशोधन केले आहे.
  • प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र यशस्वी करण्यासाठी ज्ञानरचनावाद पध्दती वापरून शाळा प्रगत केली आहे. करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • लोकचेतना अभियानात तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करत असतांना पथनाट्यात सक्रीय सहभाग नोंदवला आहे.
  • SCERT मध्ये शैक्षणिक साहित्य निर्मितीचे ‘आरेखन’ चे १० दिवसाचे प्रशिक्षण पुर्ण केले असून केंद्रातील शिक्षकांची शैक्षणिक साहित्य निर्मितीची कार्यशाळा घेतली आहे.
  • बालसंस्कार शिबिरातून बालकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
  • शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी सतत प्रयत्न असतो.

सामाजिक कार्य —

  • आदिवासी कुटूंबाना दिवाळी भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
  • वाचन संस्कृती वाढावी म्हणून ‘ग्रंथ आपल्या दारी’ यासारख्या उपक्रमांचा प्रचार व प्रसार केला आहे.

साहित्यिक कार्य —

  • 1000 च्या वर कविता लिहल्या असून “चांदणं शब्दाचं” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.
  • या काव्यसंग्रहास तेजभुषण साहित्य संस्था महाराष्ट्र व मुस्लीम मराठी साहित्यिक सांस्कृतिक मंडळ कडून उत्कृष्ट कलाकृती म्हणून सन्मानित.
  • “वैचारिक कवडसे” लेखसंग्रह प्रकाशित.
  • बालकवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर.
  • कविकट्टा व ओंजळ शब्द फुलांची, फातीमामाई या प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून कविता प्रकाशित.
  • जीवन गौरव मासिक, अनेक दिवाळी अंक व वृत्तपत्रातून अनेक कविता प्रकाशित.
  • ‘नारी तुझी कथा आणि व्यथा’ या लेखास प्रथम क्रमांक प्राप्त.
  • नेहरू युवा केंद्र अलिबाग वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे आयोजित लेख स्पर्धेत ‘वनसंवर्धन काळाची गरज’ या विषयावरील लेखास उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त.
  • रायगडचा आवाज, दैनिक सकाळ, रायगड टाइम्स, पैगाम इत्यादी अनेक वृत्तपत्रातून शैक्षणिक, वैचारिक लेख प्रसिद्ध.
  • ज्ञानपुष्प या केंद्रस्तरीय शिक्षक हस्तपुस्तिकेचे संपादक म्हणुन काम पाहिले आहे.
  • उर्जां या राज्यस्तरीय दिवाळी अंकासाठीही संपादक म्हणून काम पाहिले आहे.
  • व्हाटसअप वरून होणाऱ्या online काव्य स्पर्धेत चारोळी, हायकू, काव्यांजली, अष्टक्षरी सहभाग घेऊन अनेक कवितांना पारितोषिक प्राप्त.

भूषविलेली पदे —

  • शिक्षक संघटनात जिल्हास्तरीय महिला संघटक.
  • शिक्षक पतपेढीवर व्हा. चेअरमन व कार्यकारिणी सदस्य म्हणुन काम पाहिले आहे.
  • कोकण मराठी साहित्य परिषद माणगावमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
  • सांस्कृतिक कार्य समिती माणगाव मध्ये कार्यरत.

मिळालेले पुरस्कार —

  • समाजगौरव पुरस्कार २००९
  • सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार २०११
  • नारीशक्ती पुरस्कार २०१५
  • स्त्रीप्रतिष्ठा पुरस्कार २०१८
  • माणगाव रत्न पुरस्कार २०१९
  • रायगड जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार २०१९
  • माणगाव तालुका पत्रकार संघ आदर्श शिक्षिका पुरस्कार २०१९
  • जिजाऊची लेक पुरस्कार मा. ना. शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित – २०२०
  • काव्यगौरव पुरस्कार २०२१
  • काव्यभूषण पुरस्कार २०२२
  • साहित्य भूषण पुरस्कार २०२३

آواز گروپ کے اردو، مراٹھی صحافیوں کی مشاورتی نشست کامیاب


صحافت میں جدید ٹیکنالوجی آرٹیفیشل انٹیلیجنس کا استعمال پر معلوماتی رہنمائی

مہاڈ (نامہ نگار):
آواز گروپ، خطۂ کوکن کی اردو اور مراٹھی صحافت کا ایک معتبر نام، اپنے تحت اردو ہفت روزہ اخبار “کوکن کی آواز” اور مراٹھی روزنامہ “رائے گڑھ چا آواز” پابندی سے شائع کرتا ہے۔ گذشتہ دنوں آواز گروپ کے تحت دونوں اخبارات سے منسلک صحافیوں اور قلمکاروں کی ایک مشاورتی نشست منعقد ہوئی، جس کی صدارت مفتی رفیق پورکر مدنی صاحب نے کی۔

یہ نشست ہوٹل ویلکم، مہاڈ کے ہال میں منعقد کی گئی، جس کے صبح کے سیشن میں کوکن کی آواز کے صحافیوں اور دوپہر کے سیشن میں رائے گڑھ چا آواز کے صحافیوں کی ملاقات کامیابی کے ساتھ مکمل ہوئی۔ دوران نشست، دونوں اخبارات کے صحافیوں اور قلمکاروں نے ظہرانے (لنچ) کا لطف ہوٹل ویلکم میں اٹھایا اور بہترین انتظام پر منتظمین کا شکریہ ادا کیا۔

ادیبہ رکھانگے نے دبئی میں کوکن کا نام روشن کیا

ایم بی بی ایس میں 83 فیصد نمبرات سے کامیاب

دبئی (نامہ نگار): ضلع رتناگری کے شہر داپولی سے تعلق رکھنے والے دبئی میں مقیم، مقتدر کاروباری شخصیت جناب ولید عبداللہ رکھانگے اور محترمہ شگفتہ شیخ کی صاحبزادی، ادیبہ رکھانگے نے دبئی میڈیکل یونیورسٹی سے 83 فیصد نمبروں کے ساتھ ایم بی بی ایس میں شاندار کامیابی حاصل کرتے ہوئے اپنا، اپنے دادا مرحوم عبداللہ عثمان رکھانگے، اپنے اہل و عیال اور خطہ کوکن کا نام روشن کیا ہے۔

دخترِ کوکن ادیبہ رکھانگے کی تعلیم ممبئی، سعودی عرب اور دبئی کے اعلیٰ تعلیمی اداروں میں مکمل ہوئی۔ فی الحال، ادیبہ دبئی کے ہسپتالوں میں اپنی انٹرنشپ مکمل کر رہی ہیں اور مستقبل میں پیڈیاٹرک نیورولوجی میں اسپیشلائزیشن کرنے کا ارادہ رکھتی ہیں۔ اس کے ساتھ ہی، ادیبہ کلینیکل ریسرچ میں بھی سرگرم ہیں اور ان کی کئی سائنسی تحریریں شائع ہوچکی ہیں۔

ادیبہ نہ صرف تعلیمی میدان میں کامیاب ہیں بلکہ سماجی خدمات میں بھی نمایاں کردار ادا کر رہی ہیں۔ وہ دبئی میڈیکل یونیورسٹی اسٹوڈنٹ یونین اور “پریرنا انیشیٹو” کے تحت ‘دی ٹیک کیئر کلب’ کی سربراہ رہ چکی ہیں۔ یہ انیشیٹو انڈین قونصلیٹ کے سرپرستی میں خصوصی ضروریات والے بچوں (Child With Special Needs) کی دیکھ بھال اور ان کے اہل خانہ کی مدد کرتا ہے۔

اس کے علاوہ، ادیبہ نے اپنی یونیورسٹی میں لینگویج کلب کی بنیاد رکھی جس کا مقصد میڈیکل طلبہ کے درمیان مختلف زبانوں کی مہارت کو فروغ دینا ہے تاکہ وہ متنوع مریضوں کی بہترین خدمت کرسکیں۔ اس کلب کی سرگرمیوں میں عربی-اردو/ہندی تعلیم، اشاروں کی زبان کے سیشنز اور مختلف تربیتی پروگرام شامل ہیں۔

ادیبہ کی کامیابی کے اس پرمسرت موقع پر، ضلع رتناگری کے معروف سیاسی و سماجی رہنما، ادیبہ کے چچا جناب خالد رکھانگے، شاہد رکھانگے، ساجد رکھانگے اور داپولی تعلیمی حلقے کی معزز شخصیات، عزیز و اقارب اور مسلم سماج کے تمام افراد کی جانب سے ادیبہ اور ان کے والدین کو مبارکباد، دعائیں اور نیک خواہشات پیش کی جا رہی ہیں اور کہا جا رہا ہے کہ ادیبہ کی یہ کامیابی صرف ان کی محنت کا نتیجہ ہی نہیں بلکہ نسل نو کے لیے ایک مثال ہے اور طلباء نیز پورے خطہ کوکن کے لیے مشعل راہ ہے۔

فیروزہ فدا حسین تسبیح

فیروزہ فدا حسین تسبیح
چپلون، رتناگیری (مہاراشٹر)
اردو قلم کارہ، مصنفہ، صحافی اور سماجی کارکن

میں نے اپنی ابتدائی تعلیم کمو جعفر سلیمان گرلز ہائی اسکول (ممبئی) سے حاصل کی جہاں سے میں نے SSC تک کی تعلیم مکمل کی۔ اس کے بعد مولانا آزاد یونیورسٹی سے اردو لٹریچر میں B.A. کی ڈگری حاصل کی۔ الحمدللہ، بچپن سے ہی دینی تعلیم سے لگاؤ رہا ہے اور ساتھ ہی لکھنے اور مطالعہ کا بھی خاص شوق تھا۔

2001 سے باقاعدہ اخبارات کے لئے لکھنا شروع کیا اور سب سے پہلے اپنے علاقے کے اخبار کوکن کی آواز کے لئے لکھا۔ 2006 میں روزنامہ اخبار انقلاب میں میرا پہلا مضمون شائع ہوا، اس کے بعد مختلف اردو اخبارات میں مسلسل لکھتی رہی ہوں، جیسے کہ کوکن کی آواز، انقلاب، اردو ٹائمز، ممبئی اردو نیوز، راشٹر سہارا، صحافت، ہندوستان، عکسِ کوکن، محاذ ٹائمز اور دیگر اردو اخبارات۔

میرے مضامین مراٹھی اخبارات میں بھی شائع ہوتے رہے ہیں جیسے ساگر چپلون، ترون بھارت رتناگیری، شودھن ممبئی۔ میں اردو ٹائمز کی correspondent اور columnist ہوں، اور عکسِ کوکن اخبار میں مجلسِ ادارات کا حصہ ہوں۔

اردو ساہتہ اکادمی مہاراشٹر کی جانب سے 2012 میں 2010 کے ہارون رشید علیگ (journalist) ایوارڈ سے نوازا گیا، جو اس وقت کے چیف منسٹر جناب پرتھوی راج چوہان کے ہاتھوں ملا۔

2015 میں یومِ خواتین کے موقع پر Need NGO کی جانب سے “بنتِ ہند” ایوارڈ سے نوازا گیا، اور اسی طرح یومِ خواتین اور دیگر مواقع پر کئی اور ایوارڈز حاصل کیے ہیں، الحمدللہ۔

26 مارچ 2016 میں میری پہلی تصنیف “میری دیرینہ خوابوں کی تعبیر” (سماجی اصلاحی مضامین کی کتاب) “شمع فروزاں” منظرِ عام پر آئی، جو الحمدللہ کافی کامیاب رہی۔ دلی اکادمی نے میری کتاب کو پسند کیا اور 150 کتابیں اکادمی نے خریدی، الحمدللہ۔

گزشتہ سال 2023 میں ممبئی پریس اور عظیم الشان جشنِ ہندوستان کے موقع پر، ممبر آف پارلیمینٹ امتیاز جلیل کے ہاتھوں بہترین صحافی کے ایوارڈ سے بھی نوازا گیا، الحمدللہ۔

لکھنے کے ساتھ ساتھ سماجی خدمات کا جذبہ اور شوق بھی دل میں ہے، جسے میں ضروری سمجھتی ہوں۔ لکھنا میرا جنوں اور مشغلہ ہے۔ ہر دن ایک تحریر لکھنا میری عادت بن چکی ہے اور جب میں نہ لکھوں تو ایسا محسوس ہوتا ہے کہ میرا وقت ضائع ہو گیا۔

اسکول اور ادبی تقاریب میں تقاریر کے لئے بھی مدعو کیا جاتا ہوں، الحمدللہ۔

اسپورٹس میں بھی خاص دلچسپی ہے، اور مسقط عمان میں ال ماجان کی جانب سے کیرم چمپین کی ٹرافی وہاں کے معزز حضرات کے ہاتھوں حاصل کی، جو میری زندگی کی پہلی کامیابی تھی، الحمدللہ۔

فیروزہ تسبیح

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नागपूर: माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) उपलब्ध करून दिला आहे. एआय च्या वापरामुळे मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाच्या मर्यादा कमी झाल्या आहेत. AI च्या मदतीने ज्या भाषेत हवी ती माहिती सहज उपलब्ध होते, त्यामुळे तंत्रज्ञान समजून घेणे आणि त्याचा परिपूर्ण वापर करणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.

नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे होते. कार्यक्रमाला नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती संचालक डॉ. गणेश मुळे, किशोर गांगुर्डे आणि दयानंद कांबळे उपस्थित होते.

ब्रिजेश सिंह म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांवर भीती असली तरी योग्य वापरातून नवनवीन संधी निर्माण होतात. AI च्या माहितीस अधिक पडताळून आणि त्रुटी दुरुस्त करून ती नैतिक व संवैधानिक चौकटीत सादर करणे गरजेचे आहे.

अध्यक्षीय भाषणात राहुल पांडे यांनी सांगितले की, AI चा योग्य वापर भारत विरोधी कृत्यांसाठी होऊ नये, यासाठी AI ची माहिती भारतीय पद्धतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलाही AI शी जोडणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप मैत्र, संचालन डॉ. गणेश मुळे, तर आभार दयानंद कांबळे यांनी मानले. राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेतला.

लोकराज्य दुर्मिळ अंकांचे डिजिटायजेशन करावे- प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

विधानभवन परिसरात ‘लोकराज्य दुर्मिळ अंकप्रदर्शनाचे उद्घाटन

नागपूर,: ‘लोकराज्य चे दुर्मिळ अंक हे माहितीचा अमूल्य ठेवा असून त्याचे जतन व संवर्धन होण्याकरिता या अंकांचे डिजिटायजेशन करण्याच्या सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी विधानभवन परिसरातील लोकराज्य दुर्मिळ अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

नागपूर-अमरावती विभाग संचालक कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनास मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन राज्याच्या गौरवशाली परंपरेच्या माहितीचा ठेवा असणाऱ्या या प्रदर्शनाचे कौतुक केले. उद्घाटन प्रसंगी नागपूर-अमरावती विभागाचे संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे, लोकराज्यचे संपादक तथा संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे, वरिष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे, नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, वर्धा जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी यावेळी उपस्थित होते. महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच या दुर्मिळ अंकांचा ठेवा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटायझेशन आणि अन्य आधुनिक पद्धतीचा उपयोग करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. दुर्मिळ अंकांच्या मांडणीचे कौतुकही त्यांनी केले.

प्रदर्शनात वैविध्यपूर्ण माहितीचा ठेवा असणारे दुर्मिळ अंक 1964 पासूनचे अंक येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर आणि कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित अंक, मराठी संगीत रंगभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, मराठवाडा विकास व सांस्कृतिक अंक, स्वातंत्र्यदिन विशेषांकासह महाराष्ट्र राज्यातील महान व्यक्तीमत्वे, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक असा वैविध्यपूर्ण ठेवा तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती असणारे 150 अंक या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत.

मान्यवरांच्या भेटी व सेल्फी स्टँडवर छायाचित्रे

विधीमंडळ अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने विधानभवन परिसरात विधानसभा व विधानपरिषद सदस्यांची लगबग होती. वाटेतच लोकराज्य दुर्मिळ अंकांचे आकर्षक प्रदर्शन दिसताच त्यांनी प्रदर्शनास भेट दिली. यावेळी पाहणी करून आपल्या प्रतिक्रियाही नोंदविल्या. याठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी स्टँडवर पोज देऊन छायाचित्रेही काढून घेतली. भेट देणाऱ्यांमध्ये मंत्री, ॲड. आशिष जायस्वाल, आमदार सर्वश्री प्रविण दरेकर, चित्रा वाघ, बाबुसिंग राठोड, अबु आझमी, श्रीजया चव्हाण, सुहास बाबर, देवराव भोंगळे यांचा समावेश आहे. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, वनविभागाचे उपसचिव विवेक होशिंग, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धिरज अभंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रदर्शनास भेट दिली. अधिवेशन कालावधीमध्ये दररोज सकाळी 9 पासून हे प्रदर्शन पाहण्यास उपलब्ध राहणार आहे.

तळीये येथील 227 घरांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार; नवीन 92 घरे बांधून तयार!

महाड, (संजय भुवड) -22 व 23 जुलै 2021 रोजी झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेमध्ये महाड तालुक्यातील तळीये गावावर आलेल्या भीषण संकटानंतर येथील 271 नागरिकांना शासनाच्या म्हाडा यंत्रणेमार्फत घरे बांधून देण्याची कामे आता वेगात सुरू झाली असून येत्या पावसाळ्यापूर्वी यापैकी 227 घरे पूर्ण होतील असा विश्वास म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान उर्वरित 44 घरांसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

22 व 23 जुलै 2021 रोजी तळीये येथे झालेल्या या भीषण दुर्घटनेमध्ये 80 पेक्षा जास्त ग्रामस्थांना आपले प्राण गमवावे लागले होते. या भीषण दुर्घटनेची गंभीरता लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे सांत्वन केले होते.यानंतर म्हाडा विभागाचे तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी आपल्या विभागामार्फत घरे बांधून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ट्रान्सकॉन डेव्हलपर्स या कंपनीला जून 22 रोजी या कामांची वर्क ऑर्डर देण्यात आली मात्र सुरू असलेल्या पावसामुळे प्रत्यक्षात नोव्हेंबर 22 मध्ये या कामांना सुरुवात झाली.मागील वर्षी लोणेरे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात तळीये येथील ग्रामस्थांना त्यांच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. एकूण 271 पैकी पहिल्या टप्प्यामध्ये 66 घरांचे हस्तांतर करण्यात आले असून या ठिकाणी ग्रामस्थ निवास करीत आहेत, उर्वरित 92 घरांच्या करिता म्हाडा विभागाकडून ना हरकत तयार करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

या संदर्भात प्रत्यक्ष घटनास्थळी दिलेल्या भेटीदरम्यान 200 पेक्षा जास्त घरांचे आरसीसी काम पूर्ण झाल्याचे पहावयास मिळाले, यापैकी 170 पेक्षा जास्त ठिकाणी स्ट्रक्चर उभारण्यात आले असून पॅनलची कामे सुरू आहेत. मागील दोन वर्षात ज्या जागांवर कंटेनर मधून या दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांना राहावे लागत होते त्या ठिकाणी सदरचे कंटेनर दूर करावेत याकरता जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव देण्यात आले असल्याची माहिती या सूत्रांनी दिली आहे, कंटेनर परिसरातील जागा मोकळी झाल्यास या ठिकाणी किमान 25 ते 27 घरांची निर्मिती शक्य होणार आहे. घरांच्या एकूण निर्मितीबाबत येत्या पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत 227 घरांची निर्मिती करून त्यांचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास या म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखविला . उर्वरित 44 घरांकरिता जिल्हा प्रशासनाकडे जमिनी संदर्भातील प्रस्ताव दिल्याची माहिती त्यांनी दिली. या कामासाठी म्हाडा विभागाने सुमारे 52 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक दिले होते त्या पश्चात शासनाने 263 अधिक आठ मिळून 271 घरांसाठी सुमारे 77 कोटी रुपयांच्या प्रशासकीय प्रस्तावास मंजुरी दिली आहे .या ठिकाणी घरांची निर्मिती वगळता अन्य कामे जसे पाणी, रोड, दिवाबत्ती, ही रायगड जिल्हा परिषदे कडून करण्यात येणार आहेत असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एकूणच मागील तीन वर्षापासून येथील ग्रामस्थांवर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देण्यात येणाऱ्या घरांचे हस्तांतरण येत्या पावसाळ्यापूर्वी होणार असल्याने या पावसाळ्यात स्थानिकांना आपली हक्काची घरी प्राप्त होतील हे स्पष्ट झाले आहे.

सिंधू ताईंच्या कन्येला पहिला हिरकणी पुरस्कार जाहीर

तुळजापूर : ज्येष्ठ समाजसेविका अनाथांची माई सिंधुताई अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सकपाळांच्या कन्या ममता सकपाळ यांना पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार जाहीर झाला आहे. 12 जानेवारी 2025 रोजी अध्यात्मिक गुरु ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

समाजसेविका ममता सकपाळ यांना हा पुरस्कार पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानाचे सहअध्यक्ष गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर, तुळजाभवानी मंदिराचे महंत तुकोजी महाराज यांच्या हस्ते जिजाऊ जयंतीनिमित्त 12 जानेवारीला श्रीनाथ लॉन्स येथे प्रदान करण्यात येणार आहे.ज्येष्ठ समाजसेविका अनाथांची माई सिंधुताई सकपाळ यांच्या कार्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवण्याचे कार्य त्यांच्या कन्या ममता सिंधुताई सकपाळ करत आहेत. शेकडो अनाथांची ताई म्हणून हिंमतीने सांभाळ करत आहेत. त्या कार्याला बळ मिळावे यासाठी पहिलाच राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार देण्यात येत आहे.

प्रवास दिवाळी अंकाचा

दिवाळी अंकाचे आकर्षण तर पहिल्यापासून होते. पण खरं तर वाचनाची आवड ही आई कडून आली..माझ्या आईला प्रचंड वाचनाचे वेड….इतके की सगळे काम आवरून रात्री ती पुस्तके..कथा, कादंबऱ्या आणि दिवाळी अंक वाचत असे..त्यावेळी आमच्याकडे तरुण भारतचा उत्कृष्ट असा दिवाळी अंक बाबा घेऊन येत असत…तेव्हा गाजलेला अजून एक दिवाळी अंक असायचा तो म्हणजे आवाज ..अजून एक चार पाच दिवाळी अंक असायचे ….दिवाळीचा फराळ खात खात अंक वाचण्याची मजा काही औरच….आणि इथूनच दिवाळी अंक वाचण्याची सवय लागली….. पुस्तके , कादंबऱ्या वाचण्याची सवय झाली…..वाचता वाचता निबंध लिखाणाची आवड निर्माण झाली नुसती आवड नाही तर स्पर्धेतील निबंध विजेते होऊ लागले, शाळेतील मॅगझिन मध्ये लेख प्रसिद्ध होऊ लागले….स्पर्धेसाठी नाट्यछटा लिहून द्याव्यात म्हणून मैत्रिणी हक्काने आग्रह करू लागल्या..त्यामुळे काही नाट्यछटा लिहून झाल्या …शब्दांभोवती मन फेर धरून नाचू लागले…….आणि यातून 11 वीत असताना माझी स्वप्नंसुंदरी आणि जीवन आहे सुंदर मस्त या दोन कविता लिहिल्या आणि त्या गाजल्या ही….याच दरम्यान माधवी ताई देसाई, रणजित देसाई, जगदीश खेबूडकर, वसंत बापट, कवी ग्रेस, शाहीर बाबासाहेब देशमुख, सु. रा. देशपांडे अशा प्रतिथयश व्यक्तिंना भेटण्याचा योग आला…आणि आर. के. पाटील, जोशी मॅडम, चंद्रकांत कदम यांच्या सारखे उत्कृष्ट शिक्षक भेटले….आणि जीवनाने एक छान वळण घेतले…..याच वेळेला नेमके माझे वडील हे जग सोडून गेले…..माझे बाबा माझे सर्वस्व होते….त्यांच्या जाण्याने हतबल झालेल्या माझ्या मनाला शब्दांनी आधार दिला….आणि इथून सुरू झाला माझा दिवाळी अंकाचा प्रवास.

1989 साली पुणे येथील आनंद राधा या दिवाळी अंकात माझी कविता छापली आणि मला जो आनंद झाला तो आकाशाला गवसणी घालणारा होता….त्यानंतर लग्न झाले, संसार, मुले, नोकरी सांभाळताना फावल्या वेळेत अनेक कथा,कविता लिहिल्या गेल्या…. 2006 साली को.म.सा.प. कथा स्पर्धेत अनाथ या कथेला प्रथम पारितोषिक मिळाले..हीच कथा मी ताम्रपर्णि या दिवाळी अंकात छापून आली आणि या कथेसाठी तेव्हा एक हजार मानधन मिळाले..आणि तेव्हापासून गेली 18 वर्षे या दिवाळी अंकासाठी मी सातत्याने कथालेखन करत आहे..फक्त 2020 साली कोरोना मुळे अंक नव्हता.

2006 मध्ये प्रभा दिवाळी अंकात पाठवलेल्या कथेला तिसरे पारितोषिक मिळाले आणि सलग तीन वर्षे माझ्या कथा सन्मानित झाल्या. यानंतर 2007 साली प्रेम दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध झाली. 2008 साली कुलाबा वैभव, सत्यघटना, मोहिनीराज या अंकात लेख, कथा,कविता समाविष्ट करण्यात आल्या तर तर 2010 मध्ये विकास अंक, दिव्यधन, अहमदनगर वार्ता या अंकात लेख छापून आले,2011 साली वर्षाव दिवाळी अंकाने माझी कथा प्रसिद्ध केली तर 2012 साली मी को.म. सा.प. शाखेची मी सभासद झाले आणि मुक्त छंद साठी लेखन करण्याची संधी मिळाली ,2013 हितवर्धक, 2014 स्वामीसखा या दिवाळी अंकात साहित्य प्रसिद्ध झाले आता पर्यंत जवळ 14 दिवाळी अंक सातत्याने साहित्य प्रसिद्ध करत होते…2015 ला तर साहित्य संपदा, तेजोमय रायगड, आपले लक्षवेध, मराठा, वृत्त जागर आणि उल्हास प्रभात या सहा दिवाळी अंकात कथा,लेख प्रसिद्ध झाल्या तर 2016 ला या सर्व अंकाच्या जोडीला ऊर्जा दिवाळी अंक ही होता…तर 2017 ला महाड नगरी, लोकसारथी, अनिता या दिवाळी अंकांची माझ्या यादीत समावेश झाला.

तर 2018 ला कृषिराज, प्रतिभा संपन्न, साहित्यसेना, काव्यप्रेमी,शब्दकुसुम,काव्यप्रेमी,शब्द व्यासपीठ या दिवाळी अंकात साहित्य प्रसिद्ध झाले तर 2019 मध्ये अधून मधून झपूर्झामध्ये कविता प्रसारीत होत होत्या, 2020 मध्ये अगदी लोकसह्याद्री,संचार, लोकराजा,भालचंद्र या दिवाळी अंकांचा माझ्या दिवाळी अंकांच्या यादीत समावेश झाला. खर तर 2021 ला दैनिक जनमत, दुर्गांच्या देशातून, विदर्भ वतन या दिवाळी अंकात साहित्य प्रसिद्ध झाले, 2020 आणि 2021 ला कोरोना काळात काही अंक डिजिटल निघाले तर काही अंक प्रकाशित झाले होते,2022 ला तर व्यक्तिमत्त्व विकास, पुढारी दै.मुक्तागिरी, बेळगाव वार्ता, रायगड मित्र, कोंकण नाऊ, धनश्री असे अजून नवे सहा अंक यादीत समाविष्ट झाले,2023 विश्वभ्रमंती, शब्दशिवार,अक्षय सार्वमत, दैनिक रायगडचा आवाज,ऐतिहासिक रायगड,पंढरी भूषण या दिवाळी अंकात कथा आणि लेख प्रसिद्ध झाले आणि या वर्षी तर अक्षराज, शिखर आणि अनघा दिवाळी अंक ज्यामध्ये महाड आज, काल आणि उद्याहा विषय त्यांनी मला स्पेशल लिहायला दिला होता,शिखर आणि भावनागिरी या अंकानी इतिहासावर प्रकाश टाकणारे लेख मागितले होते, तर ज्वाला दिवाळी अंक 50 वर्षे पूर्ण करत असताना नामवंत साहित्यिकांचे साहित्य छापताना त्यांचे मला पत्र आले की कथा पाठवा आणि आमच्या अंकात तुमची कथा पाहिजेच अशा आशयाचा फोन आला….अशा प्रकारे आतापर्यंत जवळजवळ 55 दिवाळी अंकसाठी लेखन केले आणि मुख्य म्हणजे कथा आणि लेख जास्त प्रमाणात पाठवले आणि….पश्चिम महाराष्ट्रात एक माझा वाचक वर्ग तयार झाला..आणि यातूनच माझे कथासंग्रह असावेत ही संकल्पना पुढे आली आणि तिने आकार घेतला ….आणि माझी 17 पुस्तके प्रसिद्ध झाली दोन प्रकाशनाच्या वाटेवर आहेत……हे शब्द कायम माझ्या सोबत आहेत कारण आजही यातील 30 दिवाळी अंकात माझ्या कथा छापून येतात. दहा दिवाळी अंकात कविता,लेख छापून येतात….काही अंक कोरोना काळात काही दिवाळी अंक बंद झाले…..तर यातील काही अंक एका लेखकाला एकदाच संधी देतात……तर यातील काही अंकांचे येते…..दिवाळी झाली की दोन दिवसांनी अंक घरी यायला सुरवात होते ते अगदी देव दिवाळी पर्यंत 35 ते 40 अंक घरी येतात…मग त्यातील काही अंक साध्या पोस्टाने, काही अंक स्पीड पोस्टाने, काही अंक रजिस्टर पार्सल येतात…तर काही दिवाळी अंक कुरिअर ने येतात….एक महत्वाची गोष्ट म्हणजे पोस्टमनला माहीत असते अंक आमचे आहेत मग ते घरी अगदी वर घरी आणून देतात इतकेच नव्हे तर घर बंद असेल तर फोन करून विचारतात….कोणाकडे देऊ म्हणून…आणि मग बाजूच्या आणि समोरच्या दोन्ही वहिनी कोणतीही तक्रार न करता आलेले पार्सल घेतात ते ही कौतुकाने हे विशेष….. स्पर्श नावाचा अजून एक दिवाळी अंक असतो त्यात आपण कथा,कविता, लेख यांचे ऑडिओ करून पाठवायचे आणि त्याचा सुंदर अंक…त्या ही अंकात गेली तीन वर्षे माझ्या कवितांचा समावेश आहे…. काही असो या दिवाळी अंकांनी एक छान ओळख मिळवून दिली…त्या निमित्ताने साहित्यिकांची ओळख झाली……लेखणाला प्रेरणा मिळाली कारण या वर्षीच्या दिवाळी दिवशी सगळे फिरायला गेल्यानंतर जो वेळ मिळतो तेव्हा दिवाळीच्या मुहुर्तावर एक कथा लिहायची पुढच्या दिवाळी अंकासाठी हा माझा नेहमीचा नेम गेली 18 वर्षे नियमित सुरू आहे…….. मला जगण्याचे बळ देणाऱ्या शब्दांच्या माध्यमातून सजणारे दिवाळी अंक नेहमीच माझे सोबती आहेत.

रायगड जिल्ह्यातील पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र 1 हजार हेक्टर करण्यासाठीजिल्हा प्रशासन प्रयत्नशील- जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड जिमाका – हवामान आणि विविध समस्यांमुळे शेती उत्पादकता आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून शेतकऱ्यांना शिक्षित करणे ही काळाची गरज आहे.शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व बँकांचे सहकार्य यांच्या मदतीने शेतीत आवश्यक ते बदल करून उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यातील पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र 1 हजार हेक्टर करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.

बँक ऑफ बरोडाच्या वतीने दि. 25 नोव्हेंबर पासून रायगड जिल्ह्यात किसान पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकरयांना धनादेश वाटप आणि माहितीसत्रांचे आयोजन क्षत्रेय समाज हॉल कुरुळ येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, जी. एस हरलया, सहा. आयुक्त मत्स्य व्यवसाय, संजय पाटील, रिजनल मॅनेजर नवी मुंबई, मनीष कुमार सिन्हा, एन. डी. जी. एम., मुंबई विभाग मनोज गुप्ता यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते

श्री. जावळे म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. कोरोना संसर्गाच्या काळात देशातील सर्व क्षेत्रांचा विकास दर घटला होता. शेती क्षेत्र हे एकमेव असं क्षेत्र होतं ज्या क्षेत्रानं विकासदरात वाढ नोंदवली होती. शेतकरी पारंपारिक पिकांसोबत फळ आणि फुलशेतीकडे वळला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे दिवस डाळिंब, द्राक्षे शेतीमुळं बदलले. परदेशी फळं, भाज्यांची लागवड राज्यातील शेतकरी करु लागलेत. शेतीच्या जोरावर अनेक कुटुंबांनी प्रगती साधली. आपलं राज्य नेहमीच प्रागतिक गोष्टींचा स्वीकार करतं आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी ओळखलं जातं. शेती क्षेत्रातील संशोधकांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत शेतकऱ्यांनी श्रमाची बचत केलीच त्यासोबत वेळेची बचत देखील होत गेली. शेतकऱ्यांनी कालानुरूप शेतीत बद्दल करायला हवा.
राज्यातील शेतकरी नवनवे प्रयोग करत असून शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यामातून आपल्या जिल्ह्याचा विकास साधला पाहिजे. येथील वातावरण, पाऊस, जमिनीची प्रतवारी लक्षात घेऊन आपल्या पीक पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. रायगड जिल्ह्यात बंदर आणि विमानतळ आहे. त्यामुळे आंतराराष्ट्रीय बाजारपेठ देखील उपलब्ध होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवीन प्रयोग राबवावेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आजच्या युगात शेतकऱ्यांनी शेडनेट व पॉलिहाऊसच्या माध्यमातून विविध पीके घेण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.यासाठी बँकेचे योगदान हे मोठे असणार आहे. बँक ऑफ बडोदा ने किसान पंधरवड्याच्या माध्यमातून जिल्ह्यात 31 कोटी रुपयांची प्रकरणे मंजूर केली आहेत ही आनंदाची बाब आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हा योजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी अशी आहे. सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी बँकांच्या योजनांचा लाभ घ्यावा असे अवाहन त्यांनी यावेळी केले.बँक ऑफ बडोदाने आपले मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे याबद्द् ‍दल जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी त्यांचे कौतुक केले. बँक आपल्या ग्राहकांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे असे सांगितले.बँक ऑफ बडोदाने शेतकऱ्यांसाठी किसान पंधरवड्याचे आयोजन केले असून, त्याअंतर्गत शेती क्षेत्रातील कर्जाचे प्रमाण वाढवण्याचा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा उद्देश आहे. कृषी क्षेत्रात बँकिंग आणि तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देताना संपूर्ण भारतातील शेतकरी आणि ग्रामीण समुदायांशी संपर्क साधण्याचा बँकेमार्फत प्रयत्न केला जातो असे मनीष कुमार सिन्हा यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी सहा.आयुक्त मत्स्य व्यवसाय, संजय पाटील आणि एन. डी. जी. एम., मुंबई विभाग मनोज गुप्ता यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी पात्र बचतगट व शेतकरी लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.