Asif Ansari

सन २०२४ चे महाराष्ट्र विधानमंडळाचे (पावसाळी) अधिवेशन

दोन्ही सभागृहात संमत विधेयके  : 10

(1)       महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2024 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(2)       सन 2024 चे वि.प.वि.क्र.3- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2024 (कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग)

(3)       महाराष्ट्र विनियोजन  विधेयक, 2024 (वित्त विभाग)

(4)      महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन)

(5)       महाराष्ट्र (द्वितिय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2024 (वित्त विभाग)

(6)       महाराष्ट्र कर  विषयक   कायदे  (सुधारणा) विधेयक, 2024  (वित्त विभाग)

(7)      महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) विधेयक, 2024.

(8)       महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे (स्थापना व विनियमन) विधेयक, 2024 (कौशल्य विकास व उद्योजकता विभाग)

(9)       महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (सुधारणा) विधेयक, 2024 (नगर विकास विभाग)

(10)     महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था (सुधारणा) विधेयक, 2024 (विधि व न्याय विभाग)

०००००

चौदाव्या विधानसभा कार्यकाळात तब्बल १ हजार २९ तास १८ मिनिटे कामकाज

मुंबई, दि. १२ : चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळात तब्बल १ हजार २९ तास १८  मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास ३४  मिनिटे झाले. तर एकूण बैठकांची संख्या १३६ आहे.या विधानसभेच्या कार्यकाळात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९६.६५ टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ८२.६७ टक्के इतकी होती.

विधानसभेत पुर्न:स्थापित १९७ शासकीय विधेयके मांडण्यात आली त्यापैकी १८३ विधेयके संमत झाली.  तसेच सभागृहात नियम २९३ अन्वये एकूण २८ सूचनांवर चर्चा झाली. १४ वी विधानसभा दि. २५ ऑक्टोबर २०१९ रोजी गठित झाली. तर सभागृहाची पहिली बैठक दि. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी घेण्यात आली.