मुंबई, दि. १२ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. याबाबतची घोषणा विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.
विधानसभेत प्रत्यक्षात ९१ तास २ मिनिटे कामकाज:
विधानसभेत प्रत्यक्षात ९१ तास २ मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ८८.४८ टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ६७.७८ टक्के इतकी होती.
विधानसभेत पुर्न:स्थापित १० शासकीय विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी ८ विधेयके संमत झाली. तसेच सभागृहात नियम २९३ अन्वये एकूण प्राप्त सूचना ४ असून ४ सूचना मान्य करण्यात आल्या. त्यापैकी मान्य केलेल्या दोन सूचनांवर चर्चा झाली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
०००