“एक शिक्षिका, कवयित्री, आणि समाजसेविका – जिथे शब्द आणि ज्ञानाचा संगम जीवन समृद्ध करतो.”
जन्म तारीख – 22/12/1972
शिक्षण – B A Ded
पद – शिक्षिका
पत्ता –
आशियाना अपार्ट., कचेरी रोड
ब्लॉक न.१०२, बी विंग
कचेरी रोड माणगाव
मु. पो. ता. माणगाव जि. रायगड
पिनकोड ४०२१०४
मोबाईल नंबर – 8484932146
आवड/छंद – खेळ, वाचन, काव्यलेखन, वैचारिक लेखन
शैक्षणिक कार्य —
- तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शनात विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करून विशेष सहभाग नोंदवला आहे.
- सावित्रीबाई दत्तक पालक योजनेंतर्गत स्वतः मागासवर्गीय मुलींना दत्तक घेऊन शैक्षणिक साहित्याची मदत केली आहे.
- वृक्षसंवर्धन व संगोपनासाठी वृक्षदिंडी व वृक्षारोपणासारखे कार्यक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.
- शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नवोपक्रम व कृतीसंशोधन केले आहे.
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र यशस्वी करण्यासाठी ज्ञानरचनावाद पध्दती वापरून शाळा प्रगत केली आहे. करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
- लोकचेतना अभियानात तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करत असतांना पथनाट्यात सक्रीय सहभाग नोंदवला आहे.
- SCERT मध्ये शैक्षणिक साहित्य निर्मितीचे ‘आरेखन’ चे १० दिवसाचे प्रशिक्षण पुर्ण केले असून केंद्रातील शिक्षकांची शैक्षणिक साहित्य निर्मितीची कार्यशाळा घेतली आहे.
- बालसंस्कार शिबिरातून बालकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
- शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी सतत प्रयत्न असतो.
सामाजिक कार्य —
- आदिवासी कुटूंबाना दिवाळी भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
- वाचन संस्कृती वाढावी म्हणून ‘ग्रंथ आपल्या दारी’ यासारख्या उपक्रमांचा प्रचार व प्रसार केला आहे.
साहित्यिक कार्य —
- 1000 च्या वर कविता लिहल्या असून “चांदणं शब्दाचं” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.
- या काव्यसंग्रहास तेजभुषण साहित्य संस्था महाराष्ट्र व मुस्लीम मराठी साहित्यिक सांस्कृतिक मंडळ कडून उत्कृष्ट कलाकृती म्हणून सन्मानित.
- “वैचारिक कवडसे” लेखसंग्रह प्रकाशित.
- बालकवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर.
- कविकट्टा व ओंजळ शब्द फुलांची, फातीमामाई या प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून कविता प्रकाशित.
- जीवन गौरव मासिक, अनेक दिवाळी अंक व वृत्तपत्रातून अनेक कविता प्रकाशित.
- ‘नारी तुझी कथा आणि व्यथा’ या लेखास प्रथम क्रमांक प्राप्त.
- नेहरू युवा केंद्र अलिबाग वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे आयोजित लेख स्पर्धेत ‘वनसंवर्धन काळाची गरज’ या विषयावरील लेखास उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त.
- रायगडचा आवाज, दैनिक सकाळ, रायगड टाइम्स, पैगाम इत्यादी अनेक वृत्तपत्रातून शैक्षणिक, वैचारिक लेख प्रसिद्ध.
- ज्ञानपुष्प या केंद्रस्तरीय शिक्षक हस्तपुस्तिकेचे संपादक म्हणुन काम पाहिले आहे.
- उर्जां या राज्यस्तरीय दिवाळी अंकासाठीही संपादक म्हणून काम पाहिले आहे.
- व्हाटसअप वरून होणाऱ्या online काव्य स्पर्धेत चारोळी, हायकू, काव्यांजली, अष्टक्षरी सहभाग घेऊन अनेक कवितांना पारितोषिक प्राप्त.
भूषविलेली पदे —
- शिक्षक संघटनात जिल्हास्तरीय महिला संघटक.
- शिक्षक पतपेढीवर व्हा. चेअरमन व कार्यकारिणी सदस्य म्हणुन काम पाहिले आहे.
- कोकण मराठी साहित्य परिषद माणगावमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
- सांस्कृतिक कार्य समिती माणगाव मध्ये कार्यरत.
मिळालेले पुरस्कार —
- समाजगौरव पुरस्कार २००९
- सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार २०११
- नारीशक्ती पुरस्कार २०१५
- स्त्रीप्रतिष्ठा पुरस्कार २०१८
- माणगाव रत्न पुरस्कार २०१९
- रायगड जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार २०१९
- माणगाव तालुका पत्रकार संघ आदर्श शिक्षिका पुरस्कार २०१९
- जिजाऊची लेक पुरस्कार मा. ना. शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित – २०२०
- काव्यगौरव पुरस्कार २०२१
- काव्यभूषण पुरस्कार २०२२
- साहित्य भूषण पुरस्कार २०२३