श्रीवर्धन, (रामचंद्र घोडमोडे) – श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांचा वाढलेला ओघ पाहता प्रत्येक जण आपल्याला काही उद्योग धंदा मिळेल का या हेतूने नवनवीन उद्योगधंदे चालू करताना दिसत आहेत. श्रीवर्धन समुद्रकिनारी पूर्वी 2 ते 3 असणाऱ्या टपाऱ्याची संख्या 10 च्या वर गेली आहे. तर घोडा गाडी सेंड बाईक, बनाना राईट.जेट्स की बोट यांचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. यांच्या मध्ये रोज काही ना काही छोटा मोठा वाद होत असतो. परंतु दिनांक 6/12/2024 मस्करीतून मोठा वाद निर्माण झाला. यासाठी श्रीवर्धन पोलिसांना सुद्धा प्राचारण करावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार घोडा गाडीवाल्यांनी तर समोरील व्यावसायिकांना चाबकाचे फटके देत खाली पाडून मारल्याचे तसेच वेपण सुद्धा वापरण्यात आल्याचे घटनास्थळी असणारे नागरिक चर्चा करत आहेत.तसेच वाद सोडवण्यासाठी गेलेल्या बनाना राईट व जेट्स की व्यवसायिकांना सुद्धा मारहाण केली. यामध्ये एकाला जबर मारहाण झाल्याने पुढील उपचारासाठी तालुक्याबाहेर पाठवण्यात आले. आता मात्र कोणाची हयगय न करता राजकारण्यांच्या सुद्धा आदेशाचे पालन न करता श्रीवर्धन समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्या किती व्यवसायिकाकडे परवाना आहे. याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलत आहेत.
घोडा गाडीवाले तर व्यवसाय पूर्ण झाल्यावर आपले घोडे इतर सोडून जातात यामुळे नागरिकांच्या बागा .शेती यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. याबाबत अनेक वृत्तपत्रांत तसेच शासकीय कार्यालयांकडे लेखी तशाच तोंडी तक्रारी दाखल आहेत. आता तरी प्रशासन यावर ठोस उपाय योजना करेल का ? की एखादी जीवितहानी झाल्या नंतरच प्रशासनाला जाग येणार? मात्र झालेल्या घटनेमुळे सुस्त प्रशासनावर नागरिकांची प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
झालेल्या घटनेबाबत श्रीवर्धन पोलीस ठाण्या मध्ये रितसर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत असून मात्र प्रसिद्धीसाठी कोणतीही प्रत देण्यात आलेली नाही.